Namdar Shrimati
Namdar Shrimati
Regular price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Sale price
Rs. 126.00
Unit price
/
per
संसारात असो की राजकारणात आपल्या पत्नीनं आपण सांगू तसं वागावं अशी पतीची अपेक्षा असते, मात्र तिला महत्त्वाकांक्षेचे पंख फुटले, स्वत:च्या मनाप्रमाणं ती वागू लागली की, पतीची मानसिकता डिवचली जाते, आणि मग त्यातून निर्माण होतो त्यांच्यातील दाहक संघर्ष !
“सत्तेच्या राजकारणात केवळ महत्त्वाकांक्षी असून भागत नाही, तर कर्तृत्वदेखील तेवढंच जबरदस्त असावयास हवं. काहीच कर्तृत्व नसलेल्या तुझ्यासारख्या स्त्रियांनी केवळ स्वत:चं राजकारणच संपविलेलं आहे, असं नाही तर स्वत:चे संसारदेखील उकीरड्यावर फेकलेले आहेत.” असं हिणवणाऱ्या पतीविषयी- चिमणरावाविषयी बोलताना “ताई, तुमचं भांडण कुणाशी आहे? विठ्ठलाशी की विठ्ठलाच्या बडव्यांशी आहे?” असं एक पत्रकार पत्नीला-सुमित्राला –विचारतो तेव्हा ‘रुक्मिणीचं भांडण बडव्यांशी कसं असेल? रुक्मिणीचं भांडण विठ्ठलाशीच आहे.” असं सुमित्रा ठणकावून सांगते. पती-पत्नीमधील वाढता राजकीय संघर्ष शब्दबद्ध करणारा ‘आमदार सौभाग्यवती’ या रा.रं.बोराडे यांच्या गाजलेल्या कादंबरीचा पुढचा भाग-नामदार श्रीमती…