Your cart is empty now.
'अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी नॅनोतंत्रज्ञानावर मराठीत पुस्तक लिहिलं आहे, हे कळल्यावर मला फार आनंद झाला. भारतीय भाषांमध्ये अशी पुस्तकं निघाली, तर नॅनोतंत्रज्ञानाचा विकास होण्यासाठी त्यांचा अतिशय फायदा होईल. प्रो.सी.एन. आर. राव नॅशनल रिसर्च प्रोफेसर, लायनस पॉलींग रिसर्च प्रोफेसर नॅनोटेक्नॉलॉजी हे जीवन पूर्णपणे बदलून टाकणारं तंत्रज्ञान आहे. या खिळवून ठेवणा-या पुस्तकात नॅनोटेक्नॉलॉजीचे जादुई परिणाम अतिशय ओघवत्या आणि सोप्या भाषेत सांगितलेले असूनही त्यातली अचूकता वाखाणण्याजोगी आहे. हे पुस्तक वाचून मी स्वत: अनेक गोष्टी शिकलो. डॉ.रघुनाथ माशेलकर सीएस्आयआर भटनागर फेलो प्रेसिडेंट, ग्लोबल रिसर्च अलायन्स, एनसीएल, पुणे एकविसाव्या शतकात नॅनोसायन्स हे वेगाने पुढे येणारे तंत्र आहे. हा कठीण विषय, सोपी सोपी परंतु लिखाणास साजेशी अशी खूप उदाहरणे देऊन या दोघांनी तो समजावयास सोपा केला आहे. भविष्याचा वेध घेण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे. डॉ.अरुण निगवेकर माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग; माजी कुलगुरू, पुणे विद्यापीठ; संस्थापकीय अध्यक्ष, नॅक नॅनोसायन्स आणि नॅनोतंत्रज्ञान यांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर वेगवेगळया प्रकारांनी पडणार असल्यामुळे या तंत्रज्ञानाची माहिती समाजातल्या सगळया घटकांनाच होणं गरजेचं आहे. श्री.अच्युत गोडबोले आणि डॉ.माधवी ठाकूरदेसाई यांनी लिहिलेलं हे पुस्तक ही गरज योग्य रीतीनं भागवतं. डॉ.सतीशचंद्र ओगले रामानुजम फेलो सीनियर सायंटिस्ट, एनसीएल, पुणे नॅनोसायन्स आणि नॅनोतंत्रज्ञान हा विषय रंजकपणे सांगण्याचे आव्हान अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी अत्यंत समर्थपणे झेलले आहे. शास्त्रीय गाभ्याला धक्का न लावता सर्वांना समजेल अशा भाषेत या तंत्रज्ञानाच्या मागील मूळ तत्त्वे त्यांनी या पुस्तकात उलगडून दाखवली आहेत. डॉ. दिलीप कान्हेरे प्राध्यापक, भौतिकशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ '
Click here to be notified by email when this product becomes available.
Added to cart successfully!