Narayan Dharap Eka Gudh, Adbhut, Chittathararak Jagachi Safar नारायण धारप एका गूढ, अद्भुत, चित्तथरारक जगाची सफर by Deepa Deshmukh दीपा देशमुख

गूढ, अद्भुत, चित्तथरारक जगाची सफर म्हणजेच ‘नारायण धारप’. धारपांनी साहित्यातलं एक नवं दालन वाचकांसाठी खुलं करून दिलं. भीती, गूढता, अतार्किक जग, मनोव्यापार, अशा सगळ्या गोष्टींचा त्यात समावेश होता. वाचक यात कसा गुंतला जाईल याची पुरेपूर काळजी नारायण धारप यांनी घेतली होती. नारायण धारप यांनी हे अनाकलनीय वाटणारं जग आपल्या वाचकांना दाखवलं असलं, तरी ते जग दाखवताना अंधश्रद्धेला मुळीच थारा दिला नाही. विज्ञानाची कास त्यांनी सोडली नाही. त्यांनी आपल्या वाचकाला डोळस बनवत प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायला लावली.
नारायण धारप यांचं आयुष्य, त्यांची प्रेरणा, त्यांच्या निवडक लिखाणाचा आस्वाद, त्यांच्या विज्ञानकथा आणि भयकथा यांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन, त्यांचे वाचक त्यांच्याविषयी आणि त्यांच्या लिखाणाविषयी काय म्हणतात, नारायण धारप यांची ग्रंथ संपदा, असं सगळं काही या पुस्तकात वाचायला मिळेल.
प्रथितयश लेखिका दीपा देशमुख यांच्या लेखणीतून नारायण धारप आणि त्यांचं लिखाण, हा प्रवास या पुस्तकात अतिशय रंजकपणे उलगडलेला आहे. नारायण धारप यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न.