Skip to product information
1 of 2

Nelson Mandelanchi Sangarshmay Jeevan Kahani by Dr Kamlesh Soman नेल्सन मंडेलांची संघर्षमय जीवन कहाणी

Nelson Mandelanchi Sangarshmay Jeevan Kahani by Dr Kamlesh Soman नेल्सन मंडेलांची संघर्षमय जीवन कहाणी

Regular price Rs. 179.00
Regular price Rs. 199.00 Sale price Rs. 179.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
१९६१ साली लोकांना संपाची चिथावणी दिल्याबद्दल मंडेला यांच्यावर खटला चालवण्यात आला. या खटल्याच्या निमित्ताने त्यांनी लोकांसमोर सरकारचे वर्णद्वेषी कायदे, सरकारचा दुटप्पीपणा तसेच स्थानिक लोकांची करुणामय स्थिती-गती ठेवली. सरकार आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी आपल्यावर खटले भरले जात आहेत, हे मंडेला यांनी सर्वांना पटवून दिले. हळूहळू संघर्ष तीव्र होऊ लागला. मग सरकारने नेत्यांची धरपकड सुरू केली. खोटे आरोप, खोटे साक्षीदार, यांच्या सहाय्याने नेल्सन मंडेला यांच्यासह अहमद कॅथर्डा, डेनिस गोल्डबर्ग, सिसुलु, मकेबी आदी लोकांवर खटला चालवला गेला. सर्व आरोपींना जन्मठेप ठोठावण्यात आली.
मंडेलांची रवानगी रॉबेन बेटावर करण्यात आली.
 
मंडेलांच्या आयुष्यातील २७ वर्षे तुरुंगातच गेली. तेथील काबाडकष्टाचा काल त्यांनी अभ्यासात घालवला. तरुंगात असूनही वर्णद्वेषाविरुद्ध त्यांनी लढा चालूच ठेवला होता. लोकांचा त्यांच्या नेतृत्त्वावर मोठा विश्वास होता. लोक पुढे येऊन मंडेलांना मुक्त करा, म्हणून नारा देऊ लागले.  त्याचा जोर पुढे वाढू लागला. द.अफ्रिकेतील गोर्या सरकारला जगात तोंड दाखवणं मुश्किल होऊ लागलं. पुढे मंडेलांना मुक्त करण्यात आले.
 
मंडेला हे सार्या जगातील राजकारण्यांचे रोल मॉडेल होते. त्यांना त्यांच्या महान कार्यासाठी १९९३ साली शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले.
View full details