“तुम्हाला जर प्रभावी नेता बनण्याची इच्छा असेल तर तुम्ही हे पुस्तक प्रचंड उत्साहाने वाचायला हवे. हे पुस्तक तुमची दृष्टी व तुमच्या प्रभावाच्या सीमांचा विस्तार करेल. …ज्या लोकांचे नेतृत्व व विकास करण्याची विशेष संधी तुम्हाला मिळाली आहे त्यांच्यावर दीर्घकालीन प्रभाव कसा निर्माण करावा, हे जॉन मॅक्सवेल व जिम डॉर्नन तुम्हाला सांगतील.”
-सदर्न बॅटिस्ट पेस्टर्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. रॉनी फ्लॉइड
“केवळ जॉन मॅक्सवेल व जिम डॉर्नन हे दोघेच ‘ बिकमिंग अ पर्सन ऑफ इन्फ्लुएन्स’ सारखे पुस्तक लिहू शकतात. त्या दोघांनीही यामध्ये त्यांचा उच्च प्रतीचा अनुभव व ज्ञानकुशलता यांचा वापर केलेला आहे. त्यांची मर्मदृष्टी एखाद्या पात्यासारखी अतिशय तीक्ष्ण आहे.”
-सक्सेस मेरिटेशन इन्स्टिट्यूट इनकॉर्पोरेटचे संस्थापक पॉल जे. मेयर
“जेव्हा तुम्ही काही लोकांना भेटता तेव्हा त्यांचे हृदय व आत्मा कशाने प्रज्वलित होतात हे तुम्ही तात्काळ सांगू शकता. जॉन मॅक्सवेल व जिम डॉर्नन जेव्हा नेतृत्वगुणाविषयी बोलतात तेव्हा तुम्हाला ते स्फुलिंग तात्काळ जाणवते. माझी गिटारबाबतची जी समज आहे, तशीच त्यांची ‘प्रभाव’ या विषयावर आहे. ती समज जणू काही त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये भिनली आहे.”
-टेसर गिटार्सचे अध्यक्ष-बॉब टेलर