यु. आर. अनंतमूर्ती, के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही आणि माधव कुलकर्णी…
कन्नड कथा वाङ्मयातील बिनीचे तीन कथा लेखक आणि एक लेखिका.
कर्नाटकातील विविध भौगोलिक पार्श्वभूमी आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे लेखन!
ज्ञानपीठ, केंद्रसाहित्य अकादमी आणि इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित लेखकांची मांदियाळी!
उमा वि. कुलकर्णी यांच्या समर्थ अनुवादातून कर्नाटकाच्या विविध पैलूंचे प्रत्ययकारी दर्शन घडत असल्याचा अनुभव देणार्या कथा!