Niyati By Madhavi Desai
Niyati By Madhavi Desai
Regular price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 108.00
Unit price
/
per
नजरेसमोर एक लांबसडक वाट असते. हिरव्या वनराईतून गेलेली - निर्मनुष्य - एकाकी! असंच तर असतं जीवन. ती वाट खुणावत असते. सारे गंध, स्वर सभोवताली लवलवत असतात. झाडं सावली देतात. पक्षी रिझवतात. निर्झर गुणगुणतात. आकाश - कधी सावली देत मायेनं गोंजारतं, तर कधी भाजून काढतं. साथ भेटते. तुटते. पण कुणीच कुणाचं नसतं. शेवटी - माणूस एकटाच! एकटा. या शरीरापलीकडे एक मन असतं. ते मन जर प्रगल्भ असेल, तरच साऱ्या संकटांवर मात करता येते. एकटेपणावरही! प्रत्येक घरात, जाता-जाता सहज जरी डोकावलं, तरी एक मूक सल जाणवतो. एकाकीपणाचा सल! ती ज्याची त्याची नियती असते. अटळ नियती!