Skip to product information
1 of 1

Off Line

Off Line

Regular price Rs. 144.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 144.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language
डॉ. बाळ फोंडके हे नाव मराठी वाचकांनाप चांगलेच परिचित आहे. मानवाची बदलती जीवनशैली, विज्ञानाने केलेली प्रगती अन् तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्याने मानवाला होणारे फायदे-तोटे हा या पुस्तकातील कथांचा गाभा आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखकाने आधुनिक जगात झपाट्याने बदलत जाणार्या जीवनशैलीचे अनेक पैलू उलगडवून दाखवले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रभावित झालेल्या या व्यक्तिरेखांना भेटून आपण अचंबित आणि अंतर्मुखही होतो.
तंत्रज्ञानाला आपला सेवक बनवायचे की आपणच त्याचे गुलाम बनायचे याचे भान देणार्या या कथा वाचकांना खिळवून ठेवतात. तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे अवलंब केला तर ते आपल्याला वरदान ठरू शकते; अन्यथा तंत्रज्ञानाचा शाप अखिल मानवजातीसाठी विध्वंसक ठरू शकतो. दुसर्या महायुद्धात जपानवर टाकलेल्या अणुबाँबने झालेल्या नरसंहार हे तंत्रज्ञानाच्या प्रकोपाचेच उदाहरण!
तंत्रज्ञानाचा अवलंब हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आणि भविष्यात मानवाला तंत्रज्ञानाचा पदोपदी वापर करावा लागेल, हेही त्रिकालबाधित सत्य आहे. तथापि, अनेक छोट्या-मोठ्या, चांगल्या-वाईट घटनांतून धडा घेऊन भविष्यातील संभाव्य धोके आपण सहजगत्या टाळू शकतो; अशीच काहीशी शिकवण देणार्या कथांचा संग्रह म्हणजे ‘ऑफ लाइन’!
View full details