Padik Bangalyache Rahasya Ani Itar Katha By Dr. Madhukar Sabne
Padik Bangalyache Rahasya Ani Itar Katha By Dr. Madhukar Sabne
Couldn't load pickup availability
- सत्तर ते ऐंशी दशकातील बदलते पुणे टिपणाऱ्या या कथांमध्ये पुणेरी संस्कृतीची विविध रूपे पाहायला मिळतात.
या संग्रहातील कथा चिंतनशील असून वाचकांना निखळ आनंद देणाऱ्या आहेत.
- नात्यांचे बदलते प्रवाह, सामजिक घटितांची स्थित्यंतरे यांची रेखाटने या कथासंग्रहातून नेटकेपणाने साकारली गेली आहेत.
- जगलेल्या अनुभवांच्या चिंतनातून उमललेल्या या संग्रहातील कथांची बांधणी उत्तम असून लघुनिबंधाची आठवण जागवणारी आहे.
लेखकाविषयी :
- डॉ. मधुकर साबणे हे मागील तीन दशकांपासून सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर लिहीत आहेत.
- सामान्य लोकांना व विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक पदार्थांची संशोधनावर आधारित ओळख करून देण्यासाठी साबणे यांनी मराठी-हिंदीतून लेखन केले आहे.
- विज्ञानविषयक संशोधनाच्या निबंधपर लेखांची पुस्तके आणि ‘दर्भाचा कावळा’, ‘मनाचिये गुंफी’, ‘देशमुखांचा वाडा’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘अशी माणसे अशा भेटी’ असे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत.
- विविध महाविद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोनास चालना देणाऱ्या व्याख्यानांच्या माध्यमातून साबणे तरुणांचे प्रबोधन करत असतात.
- विज्ञान आणि साहित्य या दोन्ही विषयात रुची असणाऱ्या डॉ. मधुकर साबणे यांना विविध सन्माननीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Share
