Paishache Shahanpan - Money Matters, But Money Wisdom Matters More By Yogesh Kadam पैशाचे शहाणपण
Paishache Shahanpan - Money Matters, But Money Wisdom Matters More By Yogesh Kadam पैशाचे शहाणपण
Couldn't load pickup availability
Paishache Shahanpan By Yogesh Kadam पैशाचे शहानपण
आज पैसा कमावणे कठीण नाही; पण तो योग्य पद्धतीने हाताळणे आणि आयुष्यभर टिकेल असे आर्थिक स्वर्यं निर्माण करणे हे खऱ्या अर्थाने मोठे आव्हान आहे. एखादे कुटुंब असो किंवा आजची तरुण पिढी-सगळ्यांच्याच मनात काही समान प्रश्न सतत घोळत असतात. इतके कष्ट करुनही महिन्याच्या शेवटी माझ्या हाती काहीच शिल्लक का उरत नाही? आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं? कर्ज कधी घ्यावं आणि कधी टाळावं? गुंतवणूक कुठे आणि कशी करावी? आणि निवृत्तीनंतर आयुष्य शांत, सुरक्षित राहील का? श्री. योगेश कदम लिखित 'पैशाचे शहाणपण' है पुस्तक या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एक मार्गदर्शक ठरते. आर्थिक साक्षरतेची सुरुवात कुठून आणि कशी करावी, गरज-इच्छा हव्यास यांमधला सूक्ष्म फरक कसा ओळखावा, बचत, आपत्कालीन निधी आणि विमा का अत्यावश्यक आहेत, तसेच कर्ज कधी ओझे ठरते आणि कधी संधी बनते-है सर्व विषय पुस्तकात अत्यंत सोप्या, स्पष्ट आणि व्यवहार्य भाषेत उलगडले आहेत. गुंतवणूक म्हणजे जुगार नव्हे; ती शिस्त, संयम आणि वेळेच्या प्रवासातून घडणारी प्रक्रिया आहे-हा मूलभूत विचार पुस्तक ठामपणे मांडते. पैशांमुळे निर्माण होणारी चिंता, तुलना, भावनिक खर्च आणि झटपट श्रीमंती च्या आमिषामागील वास्तव यांचाही सखोल ऊहापोह करून वाचकांना सजग आणि सुजाण निर्णय घेण्यासाठी सक्षम वनवते. कुटुंबातील आर्थिक संवाद, पती-पत्नींचे एकत्रित निर्णय, महिलांचे आर्थिक स्वावलंबन, मुलांमध्ये लहानपणापासून रुजवले जाणारे पैशांचे संस्कार, डिजिटल व्यवहारातील आवश्यक सावधगिरी, तसेच फसवणूक व Ponzi योजनांपासून संरक्षण-या सर्वं महत्त्वाच्या वावींवर है पुस्तक प्रभावी मार्गदर्शन करते. योग्य आर्थिक नियोजन केल्यास आयुष्य अधिक स्थिर, सुरक्षित आणि नियोजनवद्ध होते, है ते सातत्याने अधोरेखित करते. नोकरी, व्यवसाय किंवा गुंतवणूक-कोणताही मार्ग निवडला तरी प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन अनिवार्य आहे. निवृत्ती नियोजन, वारसा व्यवस्थापन आणि पुढील पिढीसाठीची आर्थिक जवावदारी हैहीं या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत, हे पुस्तक ठामपणे अधोरेखित करते. 'पैशाचे शहाणपण' याचा एकच स्पष्ट आणि प्रभावी संदेश आहे-पैसा कमावणे महत्त्वाचे आहे; पण त्याहून अधिक महत्त्वाचे आहे तो शहाणपणाने हाताळणे आणि आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, स्थिर आणि शांत वनवणे. - मा. आ. सत्यजीत तांवे, नाशिक पदवीधर आमदार, महाराष्ट्र राज्य
Share
