ती विलक्षण गंभीर झाली होती.
कोणत्यातरी तणावाखाली होती.
तिचा मूड संसर्गजन्य होता.
आम्ही उभे होतो ती जागा जराशी अंधारातच होती.
बाल्कनीचा पुढचा भाग तर आणखी अंधारलेला होता.
तिकडेचख् चंदी एकटक पाहत होती.
आणि मग तिने माझा डावा हात घट्ट धरला.
‘ते पहा-’ ती अगदी हलक्या आवाजात म्हणाली –
पण तिने मला सांगाची जरूरीच नव्हती –
मलाही ते दिसत होतं – ते किंवा तो.
बाल्कनीच्या त्या टोकाकडून तो
आमच्या दिशेने येत होता.
माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकांत नारायण धारपांचे स्थान वरचे आहे.
धारपांच्या अद्भूत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.