Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rs. 180.00Rs. 200.00
अचानक एखाद्या ट्रेनच्या डब्यातील गर्दीत मिसळून ती घेऊन जाईल तिकडे जावं. खिडकीतून दिसणाऱ्या सौंदर्यात भिरकावून द्यावा आपला भूत आणि भविष्य. अचानक उतरावं एखाद्या आडरानातील स्टेशनात, जिथं आपण निरक्षर असू आणि चालत निघावं दर दिसणाऱ्या त्या ओसाड टेकड्यांच्या दिशेनं. उगीच. बघत चालावं, चालत बघावं, चालत जगावं. कुठेतरी उन्हात नांगरत असलेल्या घामेजलेल्या एकट्या शेतकऱ्याला करावी मदत दोन भाकरी पुरती आणि निघावं पुढं नवीन देश, संस्कृती पादाक्रांत करत, ठेवत अलिप्त स्वतःला त्या संस्कृतीपासून. काही काळानं पायातील पायताण आणि अंगावरील कपडे तुला उपद्रवकारक वाटतील. शरीराला खूप कमी अन्न, पाणी, हवा लागत असल्याची जाणीव होईल आणि समजेल यासाठी आयुष्य वाया घालवण्याची गरज नाही. अथक चालल्यानंतर तुझ्या शरीरावरची अवास्तव चरबी गायब झालेली असेल. मनावर चढलेले भीतीचे मळभ नष्ट झालेले असेल. सर्व सोडून मिळवलेले हे स्वातंत्र्यच खरे. बाकी सगळी माया, हे तुझ्या लक्षात येईल. तुला 'का' हे माहीत नसताना मिळालेल्या जीवनाचा प्रवास तू आनंदाने करू शकशील.. गरज आहे फक्त एकदा बाहेर पडण्याची!
Categories:
Translation missing: en.general.search.loading