Skip to product information
1 of 1

Pathe Bapurao: Vyakti Aani Vangmay | पठ्ठे बापुराव : व्यक्ती आणि वाङ्‌मय Author: Dr. Madhukar Kashinath Mondhe |डॉ. मधुकर काशिनाथ मोंढे

Pathe Bapurao: Vyakti Aani Vangmay | पठ्ठे बापुराव : व्यक्ती आणि वाङ्‌मय Author: Dr. Madhukar Kashinath Mondhe |डॉ. मधुकर काशिनाथ मोंढे

Regular price Rs. 162.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 162.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language
पठ्ठे बापुराव उत्तर पेशवाईकालीन इतिहासप्रसिद्ध सहा शाहिरीनंतरचा गणला गेलेला प्रख्यात सातवा शाहीर. त्यांचा महाराष्ट्रभर शिष्यवर्ग विखुरलेला आहे. त्यांच्या चरित्राची सुसंगत व सुसूत्र मांडणी येथे केली आहे. बापुराव भेदिक कवी व शाहीर. भेदिक आखाड्याचे. नागेशवळीचेकलगीपक्षाचेगुरुपरंपरेने नाथपंथीकालीमातेचे उपासकशाक्तपंथी. भेदिक फडासाठी सर्व प्रकारी रचना करून आध्यात्मिक कलगीतुर्‍याचे अटीतटीचे तत्कालीन शाहिरांशी सामने केले. कवी व शाहिरी हैबतीनंतर भेदिकाचे पुनरुज्जीवन केले. पठ्ठे बापुरावांनी रंगीत तमाशाची पायाभरणी करून तो अधिक लोकाभिमुख व लोकप्रिय केला. शाहिरी वाङ्‌मय व तमाशामध्ये आमूलाग्र परिवर्तन केले. रंगबाजी लावणीछक्कडविविध प्रकारीविविध चालींची लावणीझगड्याची लावणीशाहिरी वाङ्‌मय प्रकारांत फार्स या नवीन प्रकाराची भरत्यातील बतावणीसंगीत पदेलावणीला नाट्यसंगीताची जोड देऊन तमाशा रंगीत व रंजक केला. या ग्रंथातील भेदिक संहितेचा व रंगीत तमाशा संहितेचा सर्वांगीणसमग्र अभ्यास अर्थच्छटांसह व तत्त्वविवेचनासह केलेला अभ्यास वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.  
View full details