Phashi Bakhal By Ratnakar Matkari
Phashi Bakhal By Ratnakar Matkari
Regular price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Sale price
Rs. 126.00
Unit price
/
per
बोलावणं... निजधाम... जेवणावळ... रत्नाकर मतकरींच्या या असाधारण गूढकथांनी मराठी कथेमध्ये एक नवीन वाट तयार केली. या कथांमधील वातावरणे, चित्रदर्शी वर्णने, माणसाच्या मनातल्या गूढाचा घेतलेला वेध, वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि हादरवून टाकणारा शेवट, या साऱ्यांनी मराठी कथेत त्या वेळेपर्यंत अस्तित्वात नसलेले एक विलक्षण कथाविश्व निर्माण केले. यातल्या कथा रंगभूमीवर आल्या, दूरदर्शनवर सादर झाल्या, अनुवादित झाल्या. मुख्य म्हणजे, दोन पिढ्यांच्या मनावर गारूड करून राहिल्या. फार वर्षांपूर्वी वाचलेल्या या कथा वाचकांच्या स्मरणातून कधीच गेल्या नाहीत. उलट त्यांनी त्या इतरांना सतत सांगून जिवंत ठेवल्या. आजच्या तरुणांना तर या गूढकथांचे अधिकाधिक आकर्षण वाटू लागले आहे... या, कालच्या आणि आजच्या व उद्याच्या वाचकांसाठी नव्या स्वरूपात काढलेला गूढकथांचा संग्रह...