1
/
of
1
Pikpani By Indrajeet Bhalerao
Pikpani By Indrajeet Bhalerao
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
"ग्रामीण काव्य, ग्रामीण साहित्य वगैरे प्रयोग साहित्याच्या जगात सतत होत असतात; पण मातीशी अशी एकरूपता, त्या अलैकिक भावावस्थेतून निर्माण झालेली प्रतिमासृष्टी, भाषेचा अस्सलपणा, मातीशी गुंतलेल्या जीवांच्या सुख-दुःखाच्या क्षणांची नेमक्या शब्दांतून केलेली अभिव्यक्ती, हे सारं कवीच्या कवितांमधून अनुभवताना आपली सुखदुःखं चित्रमय ओव्यांतून फिरत्या जात्याला सांगणाNया बहिणीबार्इंची आणि त्याच कुळातल्या असंख्य अज्ञात बहिणींच्या ओव्यांची आठवण येते, असे श्री. पु.ल.देशपांडे यांनी म्हटले आहे. रचनेतली सहजता आणि जिव्हाळ्याच्या बोलीभाषेत वाचकाशी साधला जाणारा संवाद यामुळे ही जाणीवपूर्वक केलेली काव्यरचना न वाटता अनुभवाच्या बीजातून सहज पुÂललेल्या कोंभासारखी वाटते. तिला एक प्रकारचं स्वयंभूपण लाभलेलं आहे. अंकुरासारखे ऊन-पाऊस-मातीच्या संयोगातून पुÂटावे तसे पुÂटलेले हे धुमारे प्रत्येक कवितेतून विखुरले आहेत. या अलग करून निवडायच्या प्रतिमा नसून, ती अखंड कविता हाच एक धुमारा आहे. संग्रहातल्या पहिल्या पाच कवितांतच कवीने पोटच्या पोरापेक्षा शेताला अधिक जपणाNया शेतकरी बापाचं अगदी थोड्या ओळींत इतवंÂ प्रभावी चित्र उभं केलं आहे जसं १. उभी वाळली धीपली । जुन्या खौंदाची खपली तसा बाप हाडकुळा । मातीवानी काळा काळा फाटकातुटका जरी । कुवतीनं लई भारी उभारून दोन्ही हात । देतो जगा आशीर्वाद ३. बाप तुडवितो । शेता घालाया कुपाटे टाच्या पंज्याला कुरूप । कसा टिकावा हुरूप असा अंगोपांगी उले । आग देहभर सले "
Share
