Popup Ani Itar Vidnyakatha by Meghashri Dalvi (पॉपअप आणि इतर विज्ञानकथा)
Popup Ani Itar Vidnyakatha by Meghashri Dalvi (पॉपअप आणि इतर विज्ञानकथा)
Couldn't load pickup availability
आपण विज्ञानकथा का वाचतो? आपल्याला रोजच्या वास्तव जगाच्या पलीकडले अतर्क्स, कल्पनातीत, चकित करून टाकणारे अनुभव हवेसे वाटतात. कधी हातातल्या कामाकडे बघून मनात विचार येतो दहा वर्षांनी हे काम कसं होत असेल ? तर कधी एखाद्या गाजत असलेल्या विषयावर चर्चा करताना मनात शंका येते दुसऱ्या समांतर विश्वात या विषयाला काही महत्त्व असेल का ? विज्ञानकथा हे कुतूहल हजार तऱ्हेने शमवतात. हे शक्य आहे का, असा प्रश्न विचारायला लावणाऱ्या भन्नाट कल्पनांची झलक देऊन डोकं पार पोखरून टाकतात. या कथांमध्ये थरार असतो, गूढ असतं, नाविन्य असतं, मनात नाना प्रकारचे प्रश्न उभे करण्याचं सामर्थ्य असतं. मेघश्री दळवी यांच्या विज्ञानकथा या साऱ्या निकषांवर खऱ्या उतरून आपल्याला विज्ञान तंत्रज्ञानातल्या शक्याशक्यतांची चुणूक दाखवतात. एका अद्भुत जगाची सफर घडवतात
Share
