आपल्या संस्कृतीमध्ये तिथी आणि त्यानुसार येणारे सणवार यांना विशेष महत्त्व आहे. असे तिथीनुसार येणारे अनेक सण आपल्याकडे पूर्वापार साजरे केले जातात. प्रत्येक मराठी महिन्यातील पौर्णिमा ही अशीच एक अतिशय महत्त्वाची तिथी समजली जाते.
· ज्येष्ठ ज्योतिषी आणि अभ्यासक ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे यांनी लिहिलेल्या या पुस्तकात मराठी महिन्यातील पौर्णिमांची पार्श्वभूमी आणि त्यांचा इतिहास अतिशय रंजक आणि माहितीपूर्ण पद्धतीने सांगण्यात आला आहे.
· आपल्याकडे तिथी, सणवार कसे साजरे केले जातात याबद्दल प्रचंड कुतूहल असते. त्याबरोबर त्यामागचा इतिहास, त्याची कारणे याबद्दल जाणून घेण्याची ज्यांना इच्छा आहे, शंका आणि गैरसमज ज्यांना दूर करावेसे वाटतात त्यांच्यासाठी हे संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक आहे.