एकोणिसाव्या शतकातील साठच्या दशकातील किंवा त्यानंतरच्या दोन शतकातील वाचकांसाठी नारायण धारप हे नाव गूढरम्य, अलौकिक शक्तींचे दर्शन आपल्या साहित्यातून घडवणारा एक लोकप्रिय लेखक म्हणून आजही आठवत असेल.
‘प्राध्यापक वाईकरांची कथा’ म्हणजे एका झपाटलेल्या बंगल्याची कथा.
या बंगल्यात कोणाच्यातरी पळण्याचा, ओरडण्याचा, हसण्याचा आवाज येतो.
बंगल्यात घडणाऱ्या चित्रविचित्र घटनांनी तेथील वातावरण पछाडले जाते.
निसर्गाच्या आणि नियतीच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा काहीतरी भयंकर परिणाम असल्याचे त्या घरातील व्यक्तींना वाटते.
या बंगल्यात घडणाऱ्या अघटित घटनांमागे नेमके काय असेल, असा यक्षप्रश्न सर्वांपुढे असतो.
या समस्येतून त्या घरातील व्यक्तींची कशी सुटका होते, याचे रोमहर्षक आणि रहस्यमय वर्णन या कथेत आलेले आहे.
व्यक्तीला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते.
रहस्यमय आणि गूढ कथेच्या शोधात असणाऱ्या वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकात नारायण धारपांचे स्थान अढळ आहे.
“तिची नजर समोर फ्लॅटच्या दाराकडे गेली. दाराच्या बाहेरच एक अगदी कृश शरीराचे गृहस्थ उभे असलेले तिला दिसले.
ते बाहेरच का उभे आहेत? आत का येत नाहीत? तिच्या बालमनाला प्रश्न पडला होता- आणि विशेष । म्हणजे त्यांचा चेहरा किती दु:खी होता! डोळ्यांतून सारखं पाणी येत होतं, ते दाराच्या मागच्या बाजूने डोळे पुसत होते आणि पुन्हा आत पाहत होते.
मघाशी होमाच्या धुराने तिच्याही डोळ्यांना पाणी आलं होतं; पण आता तर काही धूर नव्हता, मग ते रडत होते की काय? तिची नजर पुन्हा समोर गेली, तेव्हा तिथे ते गृहस्थ नव्हते…”
Pradhyapak Waikaranchi Katha | प्राध्यापक वाईकरांची कथा by AUTHOR :- Narayan Dharap
Pradhyapak Waikaranchi Katha | प्राध्यापक वाईकरांची कथा by AUTHOR :- Narayan Dharap
Regular price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 203.00
Unit price
/
per