Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

PRASHNA PRADESHAPALIKADE by DINKAR JOSHI
Rs. 306.00Rs. 340.00
राजपुत्र सिद्धार्थ राजमहालात वाढतो. दु:खापासून त्याला राजा शुद्धोदन कोसो दूर ठेवतात; पण अखेर ऋषींची भविष्यवाणी खरी ठरते. राणी यशोधरेशी त्याचा विवाह होतो. पुत्र राहुलचा जन्म होतो आणि हा राजकुमार एका रात्रीत सर्वस्वाचा त्याग करून परमसत्याचा मार्ग शोधत महालाबाहेर पडतो. दीर्घकाळ भ्रमण-पदयात्रा, गुरूंचा शोध, कठोर तपस्या व वनांतील सहवास स्वीकारतो. ज्ञानप्राप्तीनंतर वाटेत भेटलेल्यास जनांस उपदेश, मानवी जीवनाचा उद्धार, तृष्णात्याग व परमसत्याच्या मार्गाचे ज्ञान गौतम बुद्ध बनून देतात. राजा शुद्धोदनास वृद्धापकाळी अपार दु:ख झाले. कारण बुद्धांनी आपला पुत्र राहुल, धाकटा भाऊ नंद यांसही दीक्षा दिली. चुलत बंधू आनंद, अनिरुद्ध हेसुद्धा दीक्षा घेऊन भिक्खू बनले. कपिलनगरी युद्धात नाश पावली. बुद्धांना दीर्घायुष्य मिळाले; पण आप्तांचे मृत्यू पाहावे लागले. तरीही ध्येयापासून जराही विचलित न होता त्यांनी जगाला ज्ञानमुक्तीचा मार्ग सांगितला. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचा देह सात दिवस कुशीनाराच्या चितेवरच होता. दावेदार भांडत होते. अखेर महाकाश्यपांनी त्यांना वंदन करून अग्नि दिला व त्यांच्या देहाची राख व अस्थींचे समान वितरण करून आपापल्या देशात स्तूपनिर्मितीसाठी दावेदारांना दिले.
Translation missing: en.general.search.loading