Skip to product information
1 of 1

Pratibha Sadhan - Bharat Sasne Yanche Sahityvishwa By: Shirish Chitnis

Pratibha Sadhan - Bharat Sasne Yanche Sahityvishwa By: Shirish Chitnis

Regular price Rs. 126.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 126.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

ज्या काळात कथा लिहायला लागले तो काळ कथा लेखनाच्या सुळसुळाटाचा असला; तरी गंभीर कथालेखकांसाठी सोपा नव्हता. शिवाय ते ज्या वाड्मयीन 'स्कूलमधून पुढे आले होते त्या 'मौज'स्कूलचे कथालेखक दबावाखाली आल्याचा तो काळ होता. ज्या 'मौज' स्कूलचा शब्द मागच्या वीस-पंचवीस वर्षांपासून मराठी वाङ्मय जगतात अखेरचा मानला जायचा. त्या स्कूलविरोधात महाराष्ट्राच्या विविध भागांतून उदयाला आलेल्या तरुण लेखकांच्या एका प्रबळ गटाने आघाडी उघडली होती. या गटातील नेटाने पुढे आलेले एक लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला' या पहिल्याच कादंबरीने एकदम मुसंडी मारल्यामुळे ते एकदम प्रकाशझोतात आले होते. त्यांच्या शब्दांना, विधानांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले होते. ढिगाने लघुकथा लिहिणाऱ्या 'मौजे' मार्फत पुढे आलेल्या व येणाऱ्या नव्या जुन्या कथाकारांची एक दिवस नेमाडे यांनी भंबेरी उडवून दिली. लघुकथा हा क्षुद्र वाङ्मयप्रकार आहे, असे स्फोटक विधान त्यांनी केले आणि भल्याभल्यांची पंचाईत करून टाकली. पंचाईत झालेल्या ह्या लेखकांत सर्व वयोगटातील कथाकार होते. त्यांच्यावर या विधानाचा थेट परिणाम झाला. बहुतेक श्रेष्ठ म्हणून नावाजले गेलेले लघुकथाकार अस्वस्थ झाले. ते दबावाखाली आले आणि त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. काहींनी कथालेखन सोडलं व ते कादंबरीलेखनाकडे वळले. काहींना यापुढे कथा लिहायची की नाही असा प्रश्न पडला. नेमाड्यांच्या एका वाक्याच्या विधानानं लघुकथालेखकांची दाणादाण उडवून दिली. अशा वेळी बहुतेक लेखक कथा लिहायला बिचकत असताना भारत सासणे यांनी नेमाड्यांच्या त्या विधानाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून दमदारपणे कथालेखन केले आणि संभ्रमित झालेल्या वाचकांना वेगळी कथा दिली आणि अवरोधलेली कथालेखनाची वाट मोकळी केली. सासणे यांच्या आगेमागे दुसरे महत्त्वाचे कथाकार जयंत पवार यांनी नेमाडे यांचं विधान मोडीत काढत अतिशय समर्थ कथा वाचकांसमोर ठेवत कथालेखनाचा मार्ग आणखी विस्तृत केला. यावर्षी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले तरुण लेखक किरण गुरव यांनी आपल्या लेखनाने सासणे-पवारांपेक्षाही लेखनाची वेगळी वाट निवडून कथा खूप उंचीवर नेऊन ठेवली आहे. गुरव यांची कथा ही सासणे व पवार यांच्या कथेचं प्रगत व प्रगल्भ रूप आहे असं म्हणता येईल.

View full details