Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Raj Kapoor The Master At Work By Rahul Ravil
Rs. 0.00

राहुल रैवल हे माझ्या वडलांचे घनिष्ट मित्र, माझे आवडते दिग्दर्शक आणि माझे आजोबा राज कपूर यांचे साहाय्यक-दिग्दर्शक. माझ्या आजोबांनी त्यांच्या अल्पशा पण दर्जात्मकदृष्ट्या श्रेष्ठ अशा जीवनकालात कोणता अनमोल कलात्मक वारसा मागे ठेवला आहे, याची जाणीव या पुस्तकाने मला करून दिली.-रणबीर कपूर

राज कपूर यांच्या अवघ्या प्रतिभेची उकल करून दाखवणारं हे पुस्तक आहे. त्यांच्या चित्रपटांतील गीतं गाण्याचा बहुमान मला लाभला होता. त्यांची संगीताची सखोल समज आणि त्यांचं त्याबाबतचं आकलन असं सर्व मला नेहमीच अचंबित करत असे. गाणं कसं चित्रित केलं जाणार आहे आणि त्यांच्या गाण्याबाबत काय अपेक्षा आहेत, हे सर्व ते एक दिग्दर्शक या नात्याने अत्यंत खोलात जाऊन आम्हाला समजावून सांगत असत.-लता मंगेशकर

राज कपूर यांचं वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन, त्यांचे चित्रपट आणि त्यांचं स्वतःचं एक विश्व याबाबत विस्मयकारक अंतर्दृष्टी देणारं असं हे पुस्तक… आणि त्यांच्यासोबत काम केलेल्या व्यक्तीनेच ते लिहिलेलं असल्याने ते वाचताना खिळवून ठेवतं.-राजकुमार हिरानी

मला राहुल रवैल यांचा हेवा वाटतो… हे पुस्तक वाचल्यावर मला असं वाटून गेलं की, ‘मूव्ही मसीहा’ राज कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मला आयुष्यात एकदा तरी मिळायला हवी होती. त्यांच्या आजूबाजूला राहिल्यानेच समृद्ध करणारे त्यांचे गुण, त्यांची उत्कटता राहुलजी आत्मसात करू शकले. राहुलजींच्या या प्रवासात जरूर सहभागी व्हा. मला खात्री आहे की, तुम्हीही माझ्यासारखाच आनंद अनुभवाल.-रमेश सिप्पी

केवळ चित्रपट निर्माते किंवा चित्रपट माध्यमाचे विद्यार्थी यांच्यासाठीच नव्हे, तर ज्या कुणाला सर्जनशीलतेच्या क्षेत्रात खोलवर बुडून बारकावे समजून घ्यायचे असतील, त्या सर्वांसाठी हे एक ‘मास्टर क्लास’ पुस्तक ठरतं. मला या पुस्तकाने खिळवून ठेवलं.-इम्तियाज़ अली

Click here to be notified by email when this product becomes available.

Translation missing: en.general.search.loading