Skip to product information
1 of 1

Rajarshi Shahu Chhatrapatinchi Bhashane By Dr. Jaysingrao Pawar

Rajarshi Shahu Chhatrapatinchi Bhashane By Dr. Jaysingrao Pawar

Regular price Rs. 126.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 126.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language
"राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सामाजिक सभांच्या आणि परिषदांच्या व्यासपीठांवरून अध्यक्ष अथवा प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या भाषणांचा हा संग्रह आहे. महाराजांच्या चरित्रवाङ्मयात या भाषणांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराजांच्या समाजक्रांतीच्या विचारांचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी या भाषणांचे अभ्यासकांना तसेच सामान्य शाहूप्रेमींना मोलाचे मार्गदर्शन होते. १. ‘पूर्वजांची कीर्ती निष्कलंक राखावी’ हा राजर्षी शाहू महाराजांचा मराठा पलटणीस उद्देशून काढलेला जाहीरनामा आहे . (दि. २३ मार्च १९१६). दुसNया महायुद्धात इंग्रजांच्या लष्करातील मराठा पलटण इराकमध्ये तैग्रीस नदीच्या तीरावर एका वेढ्यात अडकून पडली. इंग्रजांना तिच्याकडे अन्नधान्याची रसद पोहोचविता येईना. तेव्हा मराठा सैनिकांवर उपासमारीची पाळी आली. त्यांना घोड्याचे मांस भक्षण करण्यावाचून पर्याय राहिला नाही. परंतु असे मांसभक्षण केल्यास आपण जातिबहिष्कृत होऊ, अशी भीती त्यांना वाटत होती. ही वार्ता समजल्यावर शाहू महाराजांनी आपल्या ज्ञातिबांधवांचे प्राण वाचाविण्यासाठी काढलेला हा जाहीरनामा आहे. प्राप्त परिस्थितीत प्राण वाचवून पूर्वजांची कीर्ती निष्कलंक राखण्याचे आवाहन त्यांनी येथे केले आहे."
View full details