Skip to product information
1 of 1

Ramrao रामराव by Jaydeep Hardikar जयदीप हर्डीकर

Ramrao रामराव by Jaydeep Hardikar जयदीप हर्डीकर

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Language

शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील कापूस उत्पादक रामराव पंचलेनीवार यांनी २०१४ मधील एका सकाळी दोन बाटल्या कीटकनाशक प्राशन केले. जर आत्मघाताचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला असता तर शेतकरी आत्महत्येच्या आकड्यांमधील (आता अप्रकाशित) इतरांसारखा एक आकडा बनून राहिले असते. कारण भारतात प्रत्येक तीस मिनिटाला एक शेतकरी आपले प्राण गमावतो. केवळ महाराष्ट्रातच गेल्या दोन दशकांत अशा ६० हजार आत्महत्या झालेल्या आहेत.

पण चमत्कार व्हावा तसे रामराव यातून बचावले. या पुस्तकात ग्रामीण भागात कार्यरत असलेले संवेदनशील पत्रकार जयदीप हर्डीकर यांनी देशातील कधीही न संपणारे शेतीचे संकट शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. रामरावांच्या माध्यमातून त्यांनी शेती संकट सोप्या शब्दांत मांडले आहे. या माध्यमातून त्यांनी भारतीय शेतकऱ्याचे दैनंदिन आयुष्य आणि त्यातील आव्हाने जशीच्या तशी वाचकांसमोर उलगडली आहेत. त्यांचा संघर्ष आणि अनेक बाबतीत येणारे अपयश, दलदलित फसावे अशा समस्यांना त्याचे तोंड देणे आणि या सगळ्याचा शेवट करण्यासाठी त्याला

टोकाचा निर्णय घ्यावा लागणे हा सगळा पटच वाचकांसमोर उभा राहतो. अनेक वर्षांच्या ध्येयवादी पत्रकारितेमुळे रामराव या एरवी सामान्य असणाऱ्या आयुष्याचे रूपांतर आजच्या काळासाठी आवश्यक अशा जीवघेण्या आणि अत्यावश्यक कथानकात झाले आहे.
#रामराव

View full details