ब्रिटिशांचे अत्याचार मोडून काढण्याकरिता चापेकर बंधूंनी सैन्यदलातील नोकरीसाठी अतोनात प्रयत्न केले; पण यश आले नाही. मग त्यांनी हत्यारे शोधून, पुरून ठेवली. इथून सुरू झाला लढा... मुलांना एकत्र आणून शस्त्र चालवणे, गोफणगुंडा फिरवण्याचे शिक्षण दिले व संघटना स्थापन केली. ज्या मुशीत चापेकर बंधू घडले, तो समाज, परकीय भेदांना तोंड देत होता. अशातच पुण्यात प्लेगची साथ व नियंत्रण अधिकारी म्हणून वॉल्टर चार्ल्स रॅन्ड. याच्या आगमनानंतर अनन्वित अत्याचारांचे सत्रच सुरू झाले. रॅन्डच्या हुकुमतीतील स्त्री-पुरुषांवर झालेले अत्याचार म्हणजे निर्लज्जपणाने मानवी देहाची केलेली विटंबना. या संकटाला सामोरं जाताना `आता हे सहन करायचं नाही’ या विचाराने झपाटलेल्या चापेकर बंधूंच्या ‘तेजस्वी तलवारी’ व शस्त्रे बाहेर आली आणि आसमंतात फक्त एकच नाद निनादला, `गोंद्या आला रे, गोंद्या आला रे!’ परंतु, अशा क्रांतिकारकांच्या जगण्यामागचा उद्देश समाजाला कळला होता का? जाणून घेऊ या कहाणी २२ जून, १८९७ची!