Skip to product information
1 of 1

Rau राऊ BY N S INAMDAR

Rau राऊ BY N S INAMDAR

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Condition
Language

राऊ ही कादंबरी बाजीराव पेशव्यांवर आधारीत आहे ही कादंबरी तुम्हाला काही अंशी निराशही करू शकते हे आधीच सांगितलेलं बरं कारण,

कादंबरीची सुरुवात शनिवारवाड्याच्या वास्तुशांतीने होते

तर शेवट बाजीरावांच्या मृत्युने
त्यांची जडणघडण,त्यांचे लहानपण ह्याचा कादंबरीत कोठेही उल्लेख नाही

पण म्हणून कादंबरीचे महत्त्व कमी होत नाही
तसेच,
ही कादंबरी बाजीराव आणि मस्तानी ह्यांच्याकडे जास्त झुकलेली दिसून येते
कादंबरीचे कथानक बाजीरावांभोवती फिरते


आपल्या भारतीयांना एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात इतका वेड्यासारखा रस असतो की मस्तानीच्या पलीकडे जाऊन बाजीराव कोण होते हेही आपल्यातील बऱ्याच जणांना ठाऊक नसते
मुळात बाजीराव म्हणजे शतकानुशतकांनंतर जन्माला येणारा असा योद्धा
अवघे ४१ वर्षांचे शापित असे आयुष्य त्यातही अवघी 20 वर्षांची कारकीर्द आणि त्यातील 40 लढाया आणि त्यांपैकी एकही लढाई न हरलेला असा उत्तम रणपंडित म्हणजे बाजीराव पेशवा

जो संकल्प थोरल्या महाराजांनी आणि धर्मवीर संभाजीराजे यांनी मनी धरला होता तोच संकल्प पुढे या रणधीराने पूर्ण केला

महाराष्ट्राला ४०० वर्ष वाकुल्या दाखवणारी दिल्ली काबीज केली,जिंकली, न्हवे अंकित केली

बाजीरावांच्या युद्धनीतीचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी लढलेली पालखेडची लढाई
ह्या लढाईचा उल्लेख ब्रिटिश फील्ड मार्शल
BERNAND MONTGOMERY
यांनी आपल्या HISTORY OF WARFARE ह्या ग्रंथात बाजीरावांनी लढलेल्या पालखेडच्या लढाईचे वर्णन
MASTERPIECE OF STRATEGIC MOBILITY असे केलेले आहे

चातुर्याने हालचाली केल्या तर कमीतकमी नुकसान करून शत्रूला कसं नामोहरम करून दाखवता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही लढाई

पण आम्ही मात्र बाजीरावाला प्रेमवीर म्हणून रंगवतो नाहीतर त्याची जात पाहतो मुळात महापुरुषांची जात पहावयाची नसते तर त्यांनी समाजाला दिलेले विचार आणि त्यायोगे टाकलेली कात पहायची असते
हे आपण जेव्हा समजावून घेऊ तेव्हाच इतिहास नावाचा खजिना आपल्याला नीट कळेल

इतिहास हा इतिहासारखाच पहायचा असतो आणि तो तसाच स्वीकारायचा असतो नाहीतर तो समाजकंटकांच्या हातातील खेळणं बनून जातो

त्यामुळे बाजीराव-मस्तानी हे नातं जितकं शुद्ध आणि खरं होत तितकंच
बाजीराव आणि शौर्य हे नातं देखील शुद्ध आणि खरं होतं

बाजीराव धार्मिक होते पण धर्मभोळे न्हवते ते व्यवहारी होते पण ध्येयशून्य न्हवते

पुस्तकाची भाषा ना.सं.इनामदारांनी ऐतिहासिक वैगरे न वापरता सामान्य लोकांना वाचता येईल इतपत साधी व सोपी केलेली आहे
बाजीरावांच्या जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी खुबीने रंगवून सांगितले आहेत

४८३ पानी कादंबरीत कोठेही चित्र किंवा संदर्भसूची नाही
(पुस्तकाची भाषा समजण्यासाठी सोपी असल्याने त्याची फारशी गरजही नाही
आणि प्रस्तावनेत संदर्भ नमुद केलेले आहेत)

ज्यांना बाजीरावांबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांनी ह्या कादंबरीपासून सुरुवात करायला काहीच हरकत नाही

View full details