Revan Roy by Samar रेवन रॉय समर
Revan Roy by Samar रेवन रॉय समर
Couldn't load pickup availability
Revan Roy by Samar रेवन रॉय समर
मराठी भाषेत शास्त्रकल्पन कादंबऱ्या (Science Fiction) खूप कमी लिहिल्या जातात, अशी कायमच ओरड होते. ही परिस्थिती बदलायची असेल, तर नव्या विज्ञानकथांना आणि शास्त्रकल्पन कादंबऱ्यांना प्रोत्साहन देणे क्रमप्राप्त ठरते. 'समर प्रकाशनने' वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन 'रेवन रॉय' ही कादंबरी प्रकाशित केली आहे. तिची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे :- रेवन रॉय नावाचा निराशावादी मानसशास्त्रज्ञ विश्वाला संपवण्याची एक अनोखी योजना आखतो. तो सात समविचारी सहकारीही मिळवतो. पण... समांतर विश्वातील (parallel universe) तोच रेवन रॉय हा एक सज्जन आणि प्रेमळ गृहस्थ असतो. त्याला दुसऱ्या विश्वातील रेवन रॉयचा भयंकर प्रयोग समजतो, तेव्हा त्याच्यासमोर विश्वाला वाचवण्याचं आव्हान उभं राहतं. समांतर विश्वातील रेवन त्याच्याच दुसऱ्या भागाला, अर्थात आपल्या विश्वातील रेवन रॉयला, थांबवू शकेल का? आणि हे सगळं घडतं फक्त १२ तासांत !
Share
