1
/
of
1
Rules Of Deception By Christopher Reich Translated By Deepak Kulkarni
Rules Of Deception By Christopher Reich Translated By Deepak Kulkarni
Regular price
Rs. 432.00
Regular price
Rs. 480.00
Sale price
Rs. 432.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
डॉक्टर जोनाथन रॅन्सम हा जागतिक दर्जाचा गिर्यारोहक व डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेत काम करणारा नामांकित शल्यविशारद एम्मा ह्या आपल्या लावण्यवती पत्नीबरोबर गिर्यारोहण करण्यासाठी आल्प्स पर्वतात गेलेला असतो. अचानक आलेल्या एका हिमवादळात ते दोघेही सापडतात, तुफानाशी झुंजत असतानाच, बर्फाच्या थराखाली लपल्या गेलेल्या एका खोल खड्ड्यात पडून एम्माचा मृत्यू होतो. चोवीस तासांनंतर जोनाथनच्या हातात पत्नीच्या नावाने पाठवलेले एक पाकीट पडते. त्यात एम्माला खास भेट म्हणून पाठवलेल्या सामानाच्या रेल्वे पावत्या असतात. चक्रावून गेलेला जोनाथन, ते सामान ताब्यात घेण्यासाठी दूरच्या एका रेल्वे स्टेशनवर पोहोचतो व त्याच्यावर प्राणघातक हल्ला होतो. स्वसंरक्षणार्थ केलेल्या प्रतिकारात, जोनाथनच्या हातून एक हल्लेखोर मारला जातो तर दुसरा जबर जखमी झालेला असतो. आश्चर्य म्हणजे ते दोघेही पोलीस अधिकारी असतात. त्या हल्ल्यातून सावरण्याआधीच त्याहूनही तीव्र अशा मानसिक आघातामुळे तो सुन्न होऊन जातो. आपला फार मोठा विश्वासघात करण्यात आलाय हे त्याला समजते व तो मुळापासून हादरतो. एका सराईत व कुप्रसिद्ध खुन्याने त्याचा सतत केलेला पाठलाग व दुसऱ्या बाजूने पोलिसांचा ससेमिरा या कात्रीत सापडल्याने, त्याला फरार होण्यावाचून पर्याय उरत नाही. त्याच्यासमोर सूटकेसाठी एकच मार्ग असतो– एम्माने इतकी वर्षे त्याच्यापासून लपवलेलं ते महाविघातक सत्य हुडकून काढणे व त्याचबरोबर विश्वाला विध्वंसाच्या उंबरठ्यावर आणून ठेवणाऱ्या एका कुटिल कारस्थानाला कामयाब न होऊ देणे ह्या प्रवासात तो नकळत एका अनोख्या व अविश्वसनीय दुनियेत ओढला जातो. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची, आंतरराष्ट्रीय दहशतवादाची व गुप्तहेरांची गुन्हेगारी दुनिया– अशी दुनिया की जिथे प्रत्येक चेह-याआड आणखी एक चेहरा लपलेला असतो. जिथे फक्त साध्य महत्त्वाचे असते, साधनांबद्दल कसलाही विधिनिषेध नसतो.
Share
