या शब्दकोशात १८,००० मराठी शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. त्यामुळे आपल्या लिखाणात, वाचनात आलेल्या जवळपास प्रत्येक मराठी शब्दांचा अर्थ आपणास समजेल. आपण लहानपणापासून मराठी भाषा बोलत आलो आहोत, लिहीत आलो आहोत. त्यामुळे आपण अगदी सहजरीत्या मराठी भाषा लिहू शकतो, बोलू शकतो; पण अनेकदा असे होते की, आपण बोललेल्या किंवा लिहिलेल्या शब्दांचा नेमका अर्थच आपणास कळत नाही किंवा सांगता येत नाही. खुपदा असेही होते की, एखादी घटना, प्रसंग सांगण्यासाठी आपल्याला नेमका शब्दच आठवत नाही. त्यावेळीही तुम्हाला शब्दकोशाचा उपयोग होईल. या शब्दकोशामुळे आपल्या लेखनातील व बोलण्यातील गोंधळ कमी होऊन त्याला एक प्रकारची परिपूर्णता येईल. आपले लेखन इतरांपेक्षा उठावदार दिसेल आणि त्या लेखनात नेमकेपणाही येईल; तसेच कमीत-कमी शब्दात जास्तीत जास्त आशय आपणास व्यक्त करता येईल. जे लेखनाच्या बाबतीत तेच बोलण्याच्या बाबतीत देखील होईल. हा शब्दकोश लहानापासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यापासून शिक्षकांपर्यंत सर्वांनाच उपयोगी पडेल असा आहे. मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी मराठी जपली पाहिजे, वाढवली पाहिजे अशी धारणा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या घरात हा शब्दकोश असायलाच हवा. |
1
/
of
1
Saket Marathi-Marathi Shabdakosh by S. D. Zambre साकेत मराठी -मराठी शब्दकोश
Saket Marathi-Marathi Shabdakosh by S. D. Zambre साकेत मराठी -मराठी शब्दकोश
Regular price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 450.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Share
Reviews
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
No reviews yet, lead the way and share your thoughts