Skip to product information
1 of 1

Samrat Chandragupt Mourya

Samrat Chandragupt Mourya

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language
…जोवर जीवनाची धुंदी चढलेली असते, रक्तात की -भिनलेली असते तोवरच ते हवंहवंस वाटतं. तोवरच त्याचा मोह टिकतो. ती धुंदी उतरली की सारकाही व्यर्थ वाटू लागतं आणि मग सुरू होते धडपड-जीवनाची सार्थकता शोधण्याची. पण लक्षात येतं की, आयुष्य तर सरलं आहे. हातात फारच थोडे दिवस आहेत. भात्यात आता एकच बाण शिल्लक आहे आणि अचूक भेद अजून काही साधता आलेला नाहीये. प्रत्येकाच्या जीवनात हा क्षण येतो. कुणाच्या आयुष्यात लवकर तर कुणाच्या उशिरा. तो ओळखायचा असतो. हातून निसटण्यापूर्वी. अन्यथा शेवटचा बाणही व्यर्थ जाण्याची शक्यता गडद होते. हा शेवटचा बाण असतो समाधानाचा. अचूक वेध साधला गेला तर ते मिळतं आणि हे समाधान फार फार आवश्यक असतं मरताना…! त्याशिवाय आपण दुसरं काहीही सोबत नेऊ शकत नाही. मृतदेहाच्या चेहऱ्यावरही आपला ठसा उमटवून जातं हे समाधान.”
एका संन्यस्त योद्ध्याचा गूढ, थरारक, रोमांचित करणारा जीवनप्रवास उलगडणारी वेगळ्या धाटणीची ही उत्कंठावर्धक चरित्रात्मक कादंबरी.
View full details