Samrat Samudragupt By: Shubhangi Gan
Samrat Samudragupt By: Shubhangi Gan
प्राचीन भारताच्या इतिहासात गुप्त साम्राज्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर जवळपास पाचशे वर्षे कोणतीही समर्थ सत्ता अस्तित्वात नव्हती. त्यामुळे शक कुषाण यासारख्या सत्तांनी भारतावर अनेक आक्रमणे केलीत. त्यामुळे अनेक लहान-लहान राज्यांची निर्मिती झाली. या सर्व राज्यांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचे कार्य गुप्तांनी केले. भारतातल्या इतिहासातील एक वैभवशाली कालखंड म्हणून गुणांच्या कारकिदीचा उल्लेख करण्यात येतो.
महाराज चंद्रगुप्त आणि लिच्छवी कन्या कुमारदेवी ह्यांचा सामर्थ्यशाली पुत्र महाराजाधिराज समुद्रगुद्यांनी गुप्त साम्राज्याला एका उंचीवर नेलं आणि वैभवशाली, सामर्थ्यशाली आणि बलशाही असं सुराज्य निर्मित करण्यात मोलाची भर टाकली. भारतवर्ष एका छत्राखाली आणण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या. दिग्विजयी सम्राट म्हणून आपल्या बाहुबळावर, पश्चिमेस गांधारपासून कामरूपपर्यंत (आसाम) दक्षिणेत सिंहलपासून उत्तरेत हिमालयाच्या किर्तीपुर जनपदापर्यंत सर्वत्र समुद्रगुमचे राज्य होते. मध्य भारतातील आटविक राज्ये, दक्षिणेतील बारा राज्ये, सीमाप्रांतातील प्रत्यंत राज्ये राजपुताना आणि मध्यभारतातील गणराज्यांवर त्याचे वर्चस्व होते. त्याने अनेक मोहिमा केल्या आणि एकही हारलेला नाही. फक्त पराक्रमीच नाही, तर तो उत्तम कवी, वीणावादक, उत्तम राजकारणी, शाखार्थ करणारा प्रजावत्सल आणि सहृदयी राजा होता. त्याच्या काळात अध्ययन क्षेत्र, कलाक्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, व्यापार-उद्योगधंदे ह्यांची भरभराट झाली होती. खऱ्या अर्थाने तो सुवर्णयुगाचा प्रारंभ करणारा महान सम्राट होता. अशा ह्या पराक्रमी राजाची एक अचंबित करणाऱ्या कारकिदीचा अद्भूत प्रवास म्हणजेच ही कादंबरी सम्राट समुद्रगुप्त, पृथिव्यामप्रतिरथस्य असं त्याला म्हटलं जायचं.
दिगंत आहे ज्याची कीर्ती, पराक्रमाचा सूर्य तो
असा पराक्रमी अन् बलशाली आहे, मगधप्रिय सम्राट तो
सम्राट समुद्रगुप्त