Shambhar Nambari Manas By Sanjiv Padhye शंभर नंबरी माणसं
Shambhar Nambari Manas By Sanjiv Padhye शंभर नंबरी माणसं
Couldn't load pickup availability
१९८२ मध्ये साप्ताहिक दिनांक मध्ये पहिला लेख प्रसिद्ध झाला. त्यानंतर गेली ४० वर्षे अव्याहत लिखाण प्रसिद्ध होत असते. क्रीडा विषयक लिखाण क्रीडांगण, एकच षटकार, अष्टपैलू, चौकार, कर्णधार तसेच रसरंग, मार्मिक, लोकप्रभा, चित्रलेखा, विवेक, बहुश्रुत, श्री इत्यादी अनेक आघाडीच्या साप्ताहिक, पाक्षिक, मासिकांमध्ये केले. तसेच आघाडीच्या बहुतेक दैनिकांतून लिखाण प्रसिद्ध झाले आहे. लोक सत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सामना, लोकमत, पुढारी, प्रहार, ऐक्य ह्या व अशा काही दैनिकात लेख प्रसिद्ध झाले आहेत. आपलं महानगरमध्ये क्रीडा प्रतिनिधी म्हणून व आज दिनांक, सांज दिनांकमध्ये सहाय्यक संपादक म्हणून काम पाहिले. श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंकातून नियमित गेली दहा वर्षे लिखाण. अनेक दिवाळी अंकांत लेख प्रसिद्ध झाले आहेत. वृत्त दिनांक ह्या सांज दैनिकासाठी सतत १४ वर्षे अग्रलेख लिहिले आणि दरवळ हे सदर चालवले. आतापर्यंत ३५ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. आचरेकर सर, चोकर, वो जब याद आये, हसत खेळत, स्वराभिषेकी, अग्रलेख पहावा लिहून, भेटी चालीसा, कनिष्ठ (कादंबरी), रंगीबिरंगी भारत, एकमेव सुपरस्टार, अक्षराधना, आदरांजली, भन्नाट २५, माझी मुंबापुरी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, समजावून घेऊया गांधीजी (मराठी व हिंदी) छत एक भिंती अनेक, भारी साठ, भारदस्त गुणीजन, महापराक्रमी सेना, भरजरी भवताल, संस्मरणीय सोहळे, कि स्से सचिनचे, १०० किस्से सचिनचे, सचिन तेंडुलकर (इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद), वर्ल्ड कप क्रिकेट १९९६, १९९९, २००७, २०११, २०१५. किस्से सानिया मिर्झाचे, किस्से धोनीचे, गजानन महाराज चित्रकथा (मराठीचा हिंदीत अनुवाद) पैकी उद्वेली बुक्स प्रकाशित 'किस्से धोनीचे' पुस्तकाला २००७ साठी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त. सचिन तेंडुलकर, झाकीर हुसैन, राज ठाकरे अशा मान्यवर व्यक्तींच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले आहे. सध्या वृत्त दिनांक साठी कार्यरत.
Share
