Sharyati Spardha Khel By A P Kharat
Sharyati Spardha Khel By A P Kharat
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
माणूस स्पर्धाप्रिय आहे. आपल्या प्रतिस्पध्र्यांवर प्रभुत्व गाजविण्यासाठी स्पर्धकांची धडपड चाललेली असते. प्रभुत्व गाजविण्यासाठी कौशल्यांची आवश्यकता असते. आणि कौशल्ये ही खेळाच्या, स्पर्धेच्या नियमांच्या चौकटीतच वृद्धिंगत होत असतात. कौशल्ये आत्मसात करण्यासाठी खेळाडूंना आणि खेळांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी प्रेक्षकांना खेळांच्या अद्ययावत नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. नियमांची माहिती नसल्याने खेळाडू स्पर्धेत अपयशी ठरल्याची किंवा स्पर्धेचा बोजवारा उडाल्याची उदाहरणे आहेत. खेळ अधिक गतिमान व्हावा, अधिक कौशल्यपूर्ण व्हावा, स्पर्धा अधिक आकर्षक व्हाव्यात म्हणून खेळांच्या विविध संघटना खेळांच्या नियमांत बदल करतात. त्या बदललेल्या नियमांवर आधारित अशी नवीन तंत्रे विकसित करून स्पर्धा गाजविण्याचे प्रयत्न होतात. नियमात केलेला बदल हा शेवटचा शब्द नसतो. अनुभवातून, प्रयोगांतून काही नियम बदलण्याची आवश्यकता भासते व अशा बदलाचे वेळीच स्वागत करणे गरजेचे असते. ‘शर्यती-स्पर्धा-खेळ’ पुस्तकाच्या या सुधारित आवृत्तीमध्ये विविध देशी-विदेशी खेळांची सुधारित नियमांसह माहिती दिलेली आहे. खेळाडू, शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक व पंच यांना ती उपयुक्त ठरेल याबाबत शंका नाही. त्यांच्याकडून या पुस्तकाचे स्वागत होईल असा विश्वास वाटतो.