Skip to product information
1 of 1

Shripad Shrivallabh Charitramrut by Shankar Bhatt श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत

Shripad Shrivallabh Charitramrut by Shankar Bhatt श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत

Regular price Rs. 225.00
Regular price Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इ. स. १३२०मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राजु आणि सुमती या पुण्यदांपत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले. दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार होय. त्यानंतर कारंजा क्षेत्रात श्री नृसिंह सरस्वती या नावाने दुसरा अवतार घेऊन अद्भुत असे चरित्र दाखविले.

श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट्ट या कर्नाटकी देशस्थ स्मार्त ब्राह्मणाने संस्कृत भाषेत केली. 

श्रीपाद प्रभुंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा मानस अत्यंत स्तुत्य आहे. हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलुगू भाषेत अनुवादित केला जाईल. अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठणाचे फल व मूळग्रंथाच्या पाठणाचे फल सारखेच आहे. श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही, कोठेही पठन केल्यास स्वत: श्रीपाद प्रभू तेथे सूक्ष्म रूपाने राहून ते श्रवण करतात. या संबंधीची एक कहाणी सांगतो. सावधान होऊन ऐक;

श्रीपाद सात वर्षाचे झाले. त्यांचा वेदोक्त विधिने उपनयन संस्कार झाला. त्या काळात संपन्न गृहस्थाच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे चोहिकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे. बापनार्युलुच्या आनंदाला तर सीमा नव्हती. त्यांनी आपल्या जाती बांधवाना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते. ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्त चरित्र ऐकण्यास आले होते. दत्तदासानी दत्तचरित्र सांगण्यास सुरवात केली. (ते म्हणाले) ''पूर्वयुगात अनसूया आणि अत्रिमहर्षी या परम पावन दांपत्याला एका पुत्ररत्नाची प्राप्ति झाली. त्याचेच नाव दत्तात्रेय असे ठेवले होते. तेच परंज्योती दत्तात्रेय सध्या या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने पीठीकापुरम मध्ये अवतरले. त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले. उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेज:पुंज दिसू लागले. अशा दीनजन उध्दारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ दे.''

Handling Charges 25/- Extra (Included in Price)

View full details