Your cart is empty now.
'डॉ. विद्याधर ओक हे ज्येष्ठ हार्मोनियमवादक, तसेच रागसंगीताचे व्यासंगी अभ्यासक. संगीताच्या ध्यासापोटी औषधविज्ञानक्षेत्रातील करियर सोडून संगीतसंशोधनात रमलेले संशोधक कलावंत. आपल्या कल्पक संशोधनातून श्रुतींची संख्या आणि स्थाने त्यांनी निश्चित केली. जगभरात मान्यताप्राप्त या संशोधनाचे फलित म्हणजेच 22 श्रुती हार्मोनियम. जिद्द, चिकाटी अन् अथक परिश्रमाने भरलेली त्यांची ही शोधगाथा सांगत आहेत प्रख्यात संगीतसमीक्षक आणि पत्रकार सदाशिव बाक्रे. श्रुतिविज्ञान व रागसौंदर्य'
Added to cart successfully!