1
/
of
1
Streeyansathi Kayde by Adv Renu Suresh Dev
Streeyansathi Kayde by Adv Renu Suresh Dev
Regular price
Rs. 250.00
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 250.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान दर्जा व समान वागणूक देण्याची ग्वाही दिली आहे. असे असूनही आजही स्त्रियांना दुय्यम समजण्याची सामाजिक प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळेच स्त्रियांचा सन्मानाने जगण्याचा हक्क अबाधित राखण्यासाठी वेगवेगळे कायदे करण्याची गरज भासली. महिलांविषयी अशा महत्त्वाच्या कायद्यांची माहिती, कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी प्रत्येक स्त्रीला असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी उपयुक्त ठरणारे पुस्तक.
प्रत्येक कायद्यामागचा थोडक्यात इतिहास, कायदा करण्याची गरज, त्यातील महत्त्वाच्या संकल्पना, त्यातील विविध कलमे, पोटकलमे, महत्त्वाच्या तरतुदी, यांची माहिती
सर्वसामान्य वाचकाला पुस्तक वाचताना अवघड व क्लिष्ट वाटू नये, याचे भान ठेवून केलेली मांडणी. सहज महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यासारखी लेखनशैली.
कौटुंबिक पातळीवर, कामाच्या ठिकाणी, समाजात वावरताना स्त्रियांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी, आणि त्यांचा सन्मानाने जगण्याचा हक्क अबाधित राखण्यासाठी कायद्याची मदत कशी घेता येते याविषयी मार्गदर्शन
कुटुंबाच्या मालमत्तेत वारसा हक्क कोणाला मिळतो? कौटुंबिक अत्याचार कशाला म्हणायचे? पोटगी मागण्याचा अधिकार कोणाला असतो? लैंगिक छळ कशाला म्हणायचे? त्यापासून संरक्षण कसे मिळवायचे? स्त्री देहाचे अश्लील प्रदर्शन म्हणजे काय? मातृत्व लाभाचे हक्क कोणते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे देणारी उपयुक्त कायदेशीर माहिती
Share
