Swataha Palikade By Sushma Shitole स्वतः पलीकडे
Swataha Palikade By Sushma Shitole स्वतः पलीकडे
Couldn't load pickup availability
स्वतः पलीकडे
आपली स्वप्ने, कर्तृत्व विकसित करताना आपण स्वतःला केंद्रस्थानी ठेवून विचार करत असतो. हे 'स्वतःमधील गुंतणे' बऱ्याचदा अगदी नकळतपणे होत असते. त्यातून तयार होणारा जीवनपट आपल्याला स्वतः ची अशी एक 'सुरक्षित गुहा' प्रदान करत असतो. मात्र, सजगता जसजशी वाढू लागते तसतसे 'स्वतः पलिकडे' जाण्याचे प्रयत्न सुरू होतात. असाच स्वतःला व भोवतालाला स्वतः पलिकडे जाऊन निरखण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न म्हणजे लेखिका सुषमा शितोळे यांचे हे पुस्तक. आपले विचार, भावना, आयुष्यात घेतलेले बरोबर-चूक निर्णय, भोवताली घडणाऱ्या घटनांना दिलेले त्या त्या वेळचे प्रतिसाद आणि या सर्वातून 'घडत गेलेली दृष्टी' असा पट विविध लेखांमधून लेखिका इथे आपल्याला उलगडून दाखवते. समाजात वावरताना अनेक द्वंद्व तिने प्रत्यक्ष हाताळलेले आहेत. श्रद्धा - परंपरा पाळाव्यात की आधुनिकता जोपासावी, प्रेमभाव श्रेष्ठ की माझे मीपण, व्यवहार सांभाळावा की माणुसकी, नाती की करिअर, भावना की विवेक, लोभ की समाधान, मैत्र की लोक काय म्हणतील अशा अनेकविध प्रश्नांचा सामना तिने संवेदनशीलतेने केलेला आहे. म्हणूनच 'स्वतः पलिकडे' मधील लेख आपल्या समुदायाचे व परिसराचे विविध कंगोरे आपल्याला अधिक ठळकपणे उलगडून दाखवताना दिसतात. परिपूर्णतेचा आव न आणता केलेले हे तिचे अनुभवसमृध्द लिखाण आपल्याला अंतर्मुख करते. जीवनात 'प्रवाही राहण्याचे' महत्त्व त्यातून अधोरेखित होते. सरल आणि ओघवत्या शैलीतील हा लेखन-संवाद वाचकाला स्वतः पलिकडे जाण्यास उद्युक्त तर करेलच
Share
