Skip to product information
1 of 1

Swatantryaveer Savarkar

Swatantryaveer Savarkar

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language
काळ्या पाण्या’ची शिक्षा म्हटलं की, आपल्याला सर्वप्रथम आठवतात ते ‘स्वातंत्र्यवीर सावरकर.’ “तुजसाठी मरण ते जनन, तुजविन जनन ते मरण तुज सकल चराचर शरण, चराचर शरण” अशा शब्दांत स्वातंत्र्याचे गुणगान करणार्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्या यातना सहन केल्या, जे बलिदान दिले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. ते एक महान देशभक्त, साहित्यिक व कवी आणि समाज-सुधारक होते. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘मित्रमेळा अर्थात अभिनव भारत’ची स्थापना केली. ‘अखंड, एकात्म हिंदुस्थान’ अशी त्यांची ठाम भूमिका होती. राष्ट्रभक्तीने भारावलेल्या या महान क्रांतिकारकाचे बालपण ते स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग हा प्रवास प्रस्तुत पुस्तकाद्वारे गोष्टींच्या स्वरूपातून मांडण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन भावी काळात आदर्श नागरिक निर्माण व्हावेत या हेतूने लिहिलेले ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हे पुस्तक वाचकांना नक्कीच आवडेल, अशी आशा आहे.
View full details