The 80/20 Principle Marathi by Richard Koch द ८०/२० प्रिन्सिपल
The 80/20 Principle Marathi by Richard Koch द ८०/२० प्रिन्सिपल
द ८०/२० प्रिन्सिपल
जास्तीत जास्त परिणाम साध्य करा
तेही कमीत कमी प्रयत्नांत !
द ८०/२० प्रिन्सिपल हे पुस्तक २० वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रकाशित झालं, तेव्हापासून आजवर ते जागतिक स्तरावरचं सर्वाधिक खपाचं पुस्तक आणि बिझनेस क्लासिक ठरले आहे. आता, या विस्तारीत व सुधारित आवृत्तीत चार नवीन प्रकरणं समाविष्ट आहेत. लोकसंपर्काचं जाळं आपलं व्यक्तिगत आयुष्य आणि आजचं जग यांबाबतीत हे तत्त्व कसं अमलात आणावं हे सांगताना रिचर्ड कोच त्यांच्या 'आपल्या २० टक्के प्रयत्नांतूनच ८० टक्के परिणाम साधला जातो' या प्रेरणादायी व असामान्य संदेशाला नवीन अद्ययावत जोडही देत आहेत.
करोडो लोकांना ८०/२० तत्त्वाचा आजवर असा लाभ झाला आहे :
• कोणत्याही परिस्थितीत सोपा आणि झटपट मार्ग शोधणे
सर्जनशीलतेच्या शिखरावर असताना कमीत कमी वेळात जादुई परिणाम साधणे शांत संयत होणे, कमीत कमी कष्ट करणे आणि आत्यंतिक महत्त्वाची ध्येये ओळखणे
अनावश्यक बाबी टाळून, तुम्ही ज्यात कुशल आहात अशा आनंददायी गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे
महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करून कमीत कमी कष्टांत, वेळेत आणि संसाधनांसह जास्तीत जास्त परिणाम कसे साध्य करता येतात, हे रिचर्ड कोच जिवंत उदाहरणे आणि तपशीलांसह दाखवून देतात.
रिचर्ड कोच सल्लासेवा, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स, वैयक्तिक व्यवस्थापन, डिस्टिलिंग इंडस्ट्री, इंटरनेट गेमिंग अशा विभिन्न उद्योगांशी संबंधित असलेले अत्यंत यशस्वी उद्योजक! ते बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचे माजी सल्लागार असून, बेन अॅन्ड कंपनीचे भागीदार आहेत. ८०/२० तत्त्व अमलात आणणारा, कमीत कमी कष्ट करायला आवडणारा 'आळशी उद्योजक' अशी ते स्वतःची ओळख सांगतात. लंडन केप टाउन, पोर्तुगाल आणि दक्षिण स्पेन अशा विविध ठिकाणी ते वास्तव्य करतात.