The Attorney By Steve Martini Translated By Ajit Thakur
The Attorney By Steve Martini Translated By Ajit Thakur
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per
पॉल माद्रियानी यांच्याकडे जोना हेल आपली निर्वाणीची समस्या घेऊन आला, तेव्हाच पॉलच्या लक्षात आलं, की सॅन डियागोमध्ये शांतपणे आयुष्य घालवायचं आपलं स्वप्न आता दूर ठेवावं लागणार आहे. मादक द्रव्याची चटक लागलेल्या जोनाच्या मुलीने, तथाकथित स्त्रीवादी झोलांडा स्वेडच्या मदतीने, स्वत:च्या मुलीला जोनाच्या ताब्यातून पळवून नेलं होतं. जोना नातीचा सांभाळ करायला असमर्थ आहे, एवढंच नव्हे तर त्याने नातीवर अत्याचारही केले आहेत, असे आरोप मुलीने केले; हे सांगताना जोनाचा चेहरा संतापाने फुलून गेला होता. नंतर झोलांडाच्या खुनाच्या आरोपावरून पोलिसांनी जोनालाच अटक केली. त्या वृद्ध माणसानं खून केला नसेलच अशी पॉललाही खात्री देता येत नव्हती; नंतर आणखी एक व्यक्ती संशयितांच्या यादीत सामील झाली, तेव्हा निरपराध जोनाला वाचवण्यासाठी पॉलने शर्थीने प्रयत्न सुरू केले...