1
/
of
1
The Autobiography of Benjamin Franklin बेंजामिन फ्रँकलिन यांचे आत्मचरित्र

Regular price
Rs. 179.00
Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 179.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'आजवरच्या गत आयुष्याकडे मी पाहतो आहे. आता या क्षणी माझ्या मनात येतं आहे की, आयुष्याने मला पुन्हा जगण्याची संधी दिली तर? तुम्हाला सांगतो, मी पुन्हा असाच जगेन ! फक्त एखाद्या लेखकाने आपल्या लेखनाची सुधारित आवृत्ती तयार करावी, त्याप्रमाणे मी माझ्या गतआयुष्यातील चुका दुरुस्त करीत जाईन! तसे खूप काही घडून गेले आहे. झालेल्या चुका मला दुरुस्त करायच्या आहेत. ज्या अशुभ गोष्टी, दुःखद अपघात आयुष्यात घडले, त्यांना मला शांतपणे बाजूला सारायचे आहे. पण, तसे जरी मला करता आले नाही, तरी हेच आयुष्य मला पुन्हा जगायला आवडेल, एवढे मात्र नक्की! आत्ता या क्षणी आठवणींच्या संगतीतून पुनः प्रत्ययाचा आनंद मी घेतो आहे.
गयुष्यामध्ये माझ्या वाट्याला जे काही थोडे फार सुखाचे क्षण आले, ते त्या प्रभूच्या कृपेमुळेच! आजवर स्वीकारलेले मार्ग, तो प्रवास, त्यातले प्रयास आणि त्यात मिळालेले लहान-मोठे यश... आता पुनः पुन्हा डोळ्यासमोर येते आहे. अगदी कालच घडल्यासारखे! देवाने अशीच माझ्यावर कृपादृष्टी ठेवावी, अशी मी त्याच्याकडे प्रार्थना करतो आहे.
समजा, पुढील आयुष्यात काही फासे उलटे पडलेच, तर ती प्रतिकूलता सहन करण्याची शक्ती तो मला देईल, याचा मला मोठा विश्वास वाटतो. यात एक गोष्ट मात्र खरी की, माझ्या भावी आयुष्याचा पोत कसा असेल, हे केवळ त्या देवालाच माहीत! याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःखाचे धागे किती आणि कसे मिसळायचे, हे सारे काही तोच तर ठरवत असतो.

Share