The Brain by David Eagleman द ब्रेन
The Brain by David Eagleman द ब्रेन
Couldn't load pickup availability
ही गोष्ट आहे तुमच्या मेंदूची आणि तुमचीही. या गोष्टीतली पात्रं आहेत-तुमचा मेंदू, तुमचे अनुभव आणि तुमचं आयुष्य. या गोष्टीद्वारे या तिघांचा एकमेकांशी असणारा अतूट संबंध जाणून घ्या. तुमचा मेंदू तुमच्या आयुष्याला आणि तुमच्या आयुष्यातले अनुभव तुमच्या मेंदूला कसा आकार देतात हे या पुस्तकात सांगितले आहे.
ही गोष्ट म्हणजे साहसी खेळ, गुन्हेगारी आणि न्यायसंस्था, वंशविच्छेद, मेंदूची शस्त्रक्रिया, रोबोटिक्स आणि अमरत्व अशा अनेक अनवट वाटांवरचा प्रवास आहे. या मुशाफिरीत चेतापेशींच्या अब्जावधी अनुबंधांच्या अवाढव्य जाळ्यात अनपेक्षितपणे तुम्हाला तुमचीच ओळख पटेल यात शंका नाही.
'द ब्रेन या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर तुम्हाला विस्मयचकित करणारे असे आविष्करण आहे.' - स्टीफन फ्राय
'मनोरंजक आणि सखोल : जीनिअसने लिहिलेले, खाली ठेवू नये असे वाटणारे पुस्तक.' - गार्डियन
'चकित करणारे अनेक शोध असलेले पुस्तक.' - फायनान्शियल टाइम्स
'मेंदूला ताण द्यायला लावणाऱ्या कल्पना मांडणारा मेंदूविज्ञानाचा पोस्टर बॉय !' - ऑब्झर्व्हर