कंपनीचा अध्यक्ष म्हणून नव्यानेच सूत्रे हाती घेतलेल्या अॅलेक्स बेकले नावाच्या एका तरुणाची ही कथा आहे. कंपनीचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पेलताना अॅलेक्सला आपल्या व्यावसायिक व कौटुंबिक जीवनातील अयशस्विता प्रकर्षाने जाणवत असते. अशातच त्याला जीवघेणा अपघात होतो. अपघातातून वाचलेल्या अॅलेक्सला कंपन्यांसाठी सल्लागार व विशेष तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करणारा क्विन मॅक्डगॉल मार्गदर्शक म्हणून भेटतो. तो अॅलनला पाच महत्त्वाच्या आचरण पद्धती सांगतो. त्या आचरण पद्धतींचा सखोल अभ्यास आणि अवलंब करून अॅलनचं व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन कसं बहरतं, याची मनोवेधक आणि मार्गदर्शक कहाणी आहे ‘द ग्रेटर गोल.’