Skip to product information
1 of 2

The Lifestyle Diet ( Marathi) Author : Dr. Rohini Somnath Patil द लाइफस्टाइल डाएट

The Lifestyle Diet ( Marathi) Author : Dr. Rohini Somnath Patil द लाइफस्टाइल डाएट

Regular price Rs. 359.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 359.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publicatuion
Author
सर्वंकष जीवनशैलीमध्ये डाएटचं महत्त्व सहसा लक्षात येत नाही. निरोगी जीवनशैलीला साहाय्यभूत असणाऱ्या विविध घटकांबद्दल या पुस्तकात माहिती मिळते. हा प्रत्येक घटक अनोखा आहे. आतड्यापासून सुरुवात होऊन आजच्या जगात बोलबाला असणाऱ्या सुपर फूडपर्यंत सारं काही या पुस्तकातून समोर येतं. व्यवहार्य तंत्र आणि सहज तपासता येण्यासारख्या याद्यांकडे आवर्जून लक्ष द्या. वाचकांच्या विविध जीवनशैलीला अनुसरून लेखिकेने जे 101 आहार आराखडे दिले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. मनःसामर्थ्यावर विश्वास असल्याने लेखिकेने ‘ध्यानधारणा आणि प्राणायाम' यासाठी स्वतंत्र प्रकरण दिलं आहे. आहार, पोषण, तंदुरुस्ती, मनाचं आरोग्य आणि एकंदरीतच जीवनशैलीत झालेले बदल या विविध क्षेत्रांत प्राप्त केलेल्या आपल्या दशकभराच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ डॉ. पाटील या पुस्तकातून आपल्यालाही करून देतात.
ABOUT THE AUTHOR(S)
डॉ. रोहिणी पाटील एम.बी.बी.एस., या अतिशय उत्कट आहारतज्ज्ञ असून, त्यांनी ‘न्यूट्रसी लाइफस्टाइल' ही संस्था स्थापन केली आहे. त्यांनी त्यांच्या क्लाएन्ट्ससाठी आजवर किमान 1200 डाएट प्लॅन्स तयार केले असून ते प्रत्यक्षात उतरवले आहेत. नॅशनल इंडियन ॲथलिस्ट (जीएआयएल, एनवायसीएस)च्या बोर्डवर त्या अधिकृत आहारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ‘एफएसएसएआय ईट राइट ॲवॉर्ड'सारखी पारितोषिकं प्राप्त केली आहेत. विविध संस्था आणि आरोग्य संदर्भातील कार्यक्रमात आहार आणि पोषण या विषयावर अभ्यागत म्हणून लेक्चर्स दिली आहेत. ‘हेल्दी लाइफस्टाइल विथ डॉ. रोहिणी' हा रेडिओ 94.3 टोमॅटोच्या कोल्हापूर, महाराष्ट्र इथून प्रसारित होणारा रेडिओ शो त्यांनी 2019पासून 2022पर्यंत चालवला.

 

View full details