Skip to product information
1 of 1

The Millionaire Next Door

The Millionaire Next Door

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language
अनेक लोक स्वत:लाच प्रश्न विचारतात, ‘‘मी पुरेशी संपत्ती का जोडू शकलो नाही?’’ बहुसंख्य वेळा असा प्रश्न विचाारणार्‍यांमध्ये कष्टाळू, सुशिक्षित, मध्यम ते उच्च उत्पन्नधारक व्यक्तींचा समावेश असतो. मग इतके कमी लोक सधन असण्यामागचं कारण काय? याचं उत्तर ‘द मिल्यनेअर नेक्स्ट डोअर’ हे सर्वोच्च खपाचं पुस्तक जवळजवळ दोन दशकांपासून देत आहे. अमेरिकेतील श्रीमंतांची आश्चर्यजनक गुपितं सांगणारं हे पुस्तक आता नव्या आवृत्तीद्वारे डॉ. थॉमस जे. स्टॅनले यांनी एकविसाव्या शतकासाठी नव्यानं लिहिलेल्या प्रस्तावनेसह वाचकांच्या भेटीला येत आहे.
लेखकांच्या मते अमेरिकेत श्रीमंत कसं बनता येतं याबद्दल बहुसंख्य लोकांचे विचार हे पूर्णत: चुकीचे असतात. अमेरिकेतील व्यक्तींनी जोडलेली संपत्ती बर्‍याच वेळा वारसा हक्कानं मिळालेली संपत्ती, उच्च पदवी किंवा हुशारी यांपेक्षाही परिश्रम, नेटानं टाकलेली शिल्लक आणि कमाईपेक्षा खूप कमी खर्चाचं राहणीमान यांचं फळ असतं. ‘द मिल्यनेअर नेक्स्ट डोअर’ हे पुस्तक ज्या लोकांनी संपत्ती जोडलेली आहे त्यांच्या अंगी असलेल्या सात समान गुणधर्मांचा शोध घेऊन त्यांचा वारंवार उल्लेख करतं. उदाहरणार्थ, दशलक्षाधीश वापरलेली गाडी विकत घेताना भरपूर घासाघीस करतात, आपल्या संपत्तीचा अगदी लहानसा हिस्सा प्राप्तिकरापोटी भरतात, आपल्याजवळील संपत्तीचा मुलांना मोठ्या वयापर्यंत थांगपत्ताही लागू न देता मुलांचं संगोपन करतात आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला श्रीमंतांकडून अपेक्षित असलेली खर्चीक जीवनशैली पूर्णपणे टाळतात. अशा अनेक गोष्टींबद्दल तुम्हाला या पुस्तकात माहिती मिळेल.
View full details