The Nutmeg's by Amitav Ghosh द नटमेग्ज कर्स अमिताव घोष
The Nutmeg's by Amitav Ghosh द नटमेग्ज कर्स अमिताव घोष
Couldn't load pickup availability
बँडा बेट… जावाच्या पूर्वेकडे असलेल्या छोट्या छोट्या ज्वालामुखीय बेटांचा समूह. जायफळाची मूळ भूमी. १८व्या शतकाआधी प्रत्येक जायफळ या भूमीत निर्माण होत असे. जेव्हा या जायफळाने ज्ञात जगामध्ये शिरकाव केला, तेव्हा १६व्या शतकात युरोपात त्याची किंमत प्रचंड वाढली. मूठभर जायफळ देऊन घर विकत घेता येत असे! म्हणून या मौल्यवान उत्पादनासाठी युरोपीय व्यापाऱ्यांनी हा प्रदेश जिंकून घेतला आणि देशज बँडावासीयांची कत्तल केली. या छोट्या बेटांची ही रक्तरंजित नियती आजही आपल्या पृथ्वीवर संकट होऊन घोंघावताना दिसते आहे…
जायफळाचा हिंसक प्रवास म्हणजे व्यापक वसाहतवादी दृष्टिकोनाचा भाग आहे, अशी मांडणी अमिताव घोष करतात. मानवी जगणं आणि पर्यावरण यांचं शोषण करणं हे या दृष्टिकोनाचं मूलतत्त्व आहे, जे भूजराजकीय प्राबल्यामध्येही दिसून येतं.
कोव्हिड महामारी आणि ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेलं हे पुस्तक हवामान बदल, स्थलांतरितांचे प्रश्न आणि जगभरातल्या देशीय समूहांची जीवनवादी आध्यात्मिक दृष्टी यांचा ऊहापोह करत आधुनिकतेवर टीकात्मक भाष्य करतं आणि मानवी इतिहासाला अ-मानवी शक्तींनी कसा आकार दिला आहे, हेही उलगडून दाखवतं.