The Power of Now
The Power of Now
आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने वर्तमानात राहण्याची आठवण देणारे आणि आपल्या भूत आणि भविष्यकाळापासून आपल्याला मुक्त करणारे.
ते तुमच्या विचारांना रूपांतरित करू शकते. परिणाम? अधिक आनंद, अगदी आता.”
ओपरा विनफ्रे, इन ओ : दी ओपरा मॅगझीन
वर्तमानाच्या शक्ती’च्या दिशेने प्रवास करण्यासाठी आपल्याला आपले चिकित्सक मन आणि त्याने निर्मिलेल्या खोट्या ‘स्व’ला, अहंला मागे सोडून द्यायला हवे.
असे असले तरी यद्यपि हा प्रवास आहे मात्र आव्हानात्मक. एखार्ट टॉल यांनी आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी अत्यंत सोपी भाषा आणि प्रश्नोत्तरीचे स्वरूप वापरले आहे. त्यातील खुद्द शब्दच मार्गदर्शक चिन्ह आहेत.
या प्रवासात आपणापैकी बऱ्याच जणांना नवनवीन शोध लागतात – आपण म्हणजे आपले मन नव्हे, आपल्या मानसिक दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडू शकतो.
आताला शरण जाणे हीच अधिकृत मानवी शक्ती आहे. आपल्याला हेपण आढळून येते की, आपल्याभोवती सर्वत्र असलेला अवकाश आणि शांतीप्रमाणेच आपले शरीरही आंतरिक शांतीच्या प्रदेशात प्रवेश करण्याची खरी कळ आहे.
खरे तर ही शक्ती सगळीकडे आहे. प्राप्तीच्या या बिंदूतून किंवा प्रवेशद्वारातून आपण वर्तमानात प्रवेश करू शकतो.
वर्तमान क्षण, जिथे कोणतीच समस्या अस्तित्वात नसते. इथे आल्यावरच आपल्याला आढळून येते की, आपण आधीपासूनच संपूर्ण आणि परिपूर्ण असतो.
पहिल्यांदा प्रकाशित झाल्यापासून केवळ मौखिक प्रचारातून ‘वर्तमानाची शक्ती’
हे पुस्तक त्या दुर्मीळ पुस्तकांपैकी एक आहे ज्याने वाचकांमध्ये एक अनुभूती निर्मिली आहे – अशी अनुभूती जी त्यांच्या जीवनात उत्तम मूलभूत बदल घडवू शकते.
एखार्ट टॉल हे असे एक समकालीन आध्यात्मिक गुरू आहेत, जे कोणत्याही विशिष्ट धर्माशी किंवा प्रथेशी संलग्न नाहीत.
प्राचीन आध्यात्मिक अधिकारी व्यक्तींच्या काळातील आणि असंदिग्ध स्पष्टतेसह केलेले त्यांचे लिखाण एक साधा तरीही गहन संदेश देते
: वेदनेतून बाहेर पडून शांतीत प्रवेश करण्याचा एक मार्ग आहे.
‘पॅक्टिसिंग द पॉवर ऑफ नाऊ’ आणि ‘स्टीलनेस स्पीक्स्’ या पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले आहे.
ते विस्तृत प्रवास करतात आणि ब्रिटिश कोलंबियातील वानकुवरमध्ये राहतात.