Skip to product information
1 of 1

The Prophet

The Prophet

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language
जगन्नाथ खंडेराव जाधव चिंतनशील मनाचा माणूस आहे. वृत्तिगांभीर्य हा त्यांचा स्थायीभाव म्हणावा लागेल. जन्माची गरिबी सोबत घेऊन अपार कष्टानं त्यांनी स्वत:ला घडवलं. इंद्रियांना व्यासंगाचं वळण पाडलं, की मनाची श्रीमंती आपोआपच तळपत राहते; जगण्यातली सखोलता सापडते. श्री. जाधव यांची प्रवृत्ती आणि प्रकृत्तीही सखोलतेने तसंच सुजाणतेशी निरामय बनलेली आहे. उदात्त, उत्तुंग आणि उत्कट ते ते त्यांच्या आत्मीयतेला त्यामुळच भावतं. मोजक्याच परंतू मोलाच्या अशा काही कथाही त्यांनी लिहील्या आहेत. निरीक्षण, निरुपण आणि नावीन्य यांसारख्या वैशिष्ट्यांनी त्यांचं लेखन आकर्षक तर ठरतंच; पण अंतर्मुखही करतं.
प्रेषित जिब्रान हा मराठी अनुवाद रसिक वाचकांच्या मनाला बांधून ठेवणारा  द प्रॉफेट’ आहे. चौफेर चिंतनाचा चिंतामणी असलेला तत्त्वज्ञ कवी खलील जिब्रान म्हणजे सागराच्या सखोलतेलाही बुचकळ्यात आणि विस्मयात टाकणारा असा प्रतिभावंत! जवळ जवळ अशक्यप्राय वाटावीत इतकी सूक्ष्मातिसूक्ष्म परिणाम जाणून, समाजाची असंख्य स्वरूप जिब्राननं विशद केली. समाजाला सुखाचं अधिष्ठान देऊ पाहणारा तो एक प्रभावी प्रषिताच्या रुपातला बंडखोर माणूस होता. त्यांचं तत्त्वज्ञान अपार करुणेनं ओथंबलेलं आहे. काल्पनिक, कोरड्या कल्पनांच्या विचाराला तत्त्वज्ञान म्हणता येत नाही, हे ही जिब्रानकडूनच शिकावं लागतं. मित्रपरिवारात जे. के. म्हणून ओळखले जाणारे जगन्नाथ खंडेराव जाधव हे जिब्रानच्या प्रेमात पडलेले गृहस्थ आहेत. प्रस्तुतचा त्यांचा भावानुवाद म्हणजे जिब्रानची जीवन-शिकवण सांगणारे अनुपम लेखन आहे हे सहज पटेल!
– फ. मुं. शिंदे
View full details