The Secret
The Secret
महान नेतृत्वाचे गमक काय आहे?
अधिकारपदावरील- मग तो एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत असो वा एखाद्या स्थानिक स्वयंसेवी गटात असो-प्रत्येकाला कधी ना कधी वरील प्रश्न पडतो. सध्या केन ब्लॅचर्ड, ज्यांची नेतृत्वावरील पुस्तके २० दशलक्ष प्रतींहून जास्त विकली गेली आहेत आणि मार्क मिलर, ज्यांनी अगदी तळातल्या कामगारपदापासून कामाला सुरुवात केली व चिकफिल-ए या अमेरिकेतील एका सर्वांत मोठ्या जलदगती सेवा रेस्टॉरंटच्या शृंखला असलेल्या कंपनीच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. महान नेत्यांना अगोदरच माहिती असलेले यशाचे गमक ते दोघे आता आपल्यासमोर खुले करीत आहेत. इतरांना कार्यप्रेरित करून मनापासून काम करायला स्फूर्ती देण्यासाठी तुम्हाला जे काही करणे आवश्यक आहे ते हे दोघं एकत्रितपणे सांगत आहेत. इंटरनॅशनल बेस्टसेलर असलेल्या आणि २२ भाषांमध्ये अनुवादित झालेल्या या पुस्तकाची ही आवृत्ती पूर्णपणे सुधारित करण्यात आलेली आहे. यात एक नवीन प्रकरण घालण्यात आले आहे, ज्यामुळे हे पुस्तक अधिक चांगल्या प्रकारे शिकण्याचे आणि विकासाचे साधन बनले आहे.
“तुम्हाला हे गमक माहीत असेल तर परस्पर नातेसंबंध आणि परिणाम या दोहोंत भरभराट होईल. यशापासून उत्तुंग यशापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या जीवनातील ही योग्य घडामोड ठरेल.”
– बॉब ब्युफोर्ड, हाफटाईमचे लेखक.