Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Bonobo : Ek Shantidoot By Vanessa Woods Translated By Sharmila Phadke
Rs. 450.00Rs. 500.00

सरतेशेवटी, या पुस्तकातील इतिहासातला फेरफटका आशावाद सूचित करणारा आहे. आपली जीवनमूल्ये अपरिवर्तनीय नाहीत, ती बदलतात. डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर म्हणाले होते, 'वैश्विक नैतिकतेची
कमान खूप उंच आहे; पण ती न्यायाकडे झुकणारी आहे. ' छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये इतिहासाचे अवलोकन केले, तर द्वेषाचे बी पेरून कलहाचे पेव फोडण्यासाठी वंशवाद आणि लढाऊ राष्ट्रवाद जगात पुन्हा पुन्हा डोके वर काढत असतात असे वाटेल, त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे आपल्याला वाटते. असले संघर्ष ज्या समाजात घडतात, तो समाज तर बदलत असतो. त्या बदलाची दिशा सहिष्णुता, आदर आणि न्याय्यता यांच्याकडे जाणारी असते. त्या रेषेत प्रवास करताना चढ-उतार होतच राहतात. आज आपण उतरणीला लागलो असलो आणि अजूनही फार लांबचा पल्ला गाठायचा असला तरी आपण मजल-दरमजल करत इथवर आलो आहोत, त्यामुळे आपल्याला आशा वाटली पाहिजे. भविष्यात आकस्मिक आश्चर्याचे धक्के बसू नयेत म्हणून आपण भविष्याला आकार देत राहिले पाहिजे. अजून खूप काम करायचे आहे. चांगले आणि शांततापूर्ण एकात्म जीवन जगायचे असेल, तर मार्ग सुज्ञपणे निवडला पाहिजे. आपण तसे करू शकू, असा मला विश्वास आहे.
- रघुराम राजन

Translation missing: en.general.search.loading