Your cart is empty now.
स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच भारताच्या मागे असुरक्षित सीमांचं दुखणं लागलं आहे. काश्मीरबद्दल आपल्याला बरंच माहीत असतं, परंतु ईशान्य भारतातही हे दुखणं आहे ह्याची जाणीव आपल्याला हल्ली हल्ली होऊ लागली आहे. संघराज्यातून फुटून निघण्याची आकांक्षा मनात धरणारे फुटीरतावादी आले की, मागोमागच त्याला आळा घालण्यासाठी म्हणून लष्करास तिथं येणं क्रमप्राप्त ठरतं आणि ह्या सगळ्या भानगडीत तिथला सामान्य माणूस वेठीला धरला जातो, भरडलाही जातो. कधीकधी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या पटावरची प्यादी म्हणून वापरलाही जातो.
मणिपूर हे ईशान्य भारतातलं चिमुकलं, हिरवंगार वनवैभव लाभलेलं चिमुकलं राज्य. जवळजवळ स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आफस्पा ह्या मिलिटरी कायद्याचं राज्य तिथं चालू आहे. इरोम शर्मिला ह्या तुमच्या-आमच्यासारख्याच एका जनसामान्यातून आलेल्या मुलीनं ह्याविरुद्ध एकटीनं लढा द्यायचा विजिगीषु प्रयत्न केला; तिची ही कहाणी. आकाशात एखादा तारा चमकून जावा तशी ही स्त्री तेथील क्षितिजावर उगवली आणि तिनं प्राप्त परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. ती त्यात जिंकली की हरली, हा मुद्दा मुळी महत्त्वाचा नाहीच आहे. परंतु एका सर्वसामान्य घरातून आलेली स्त्री हे करू शकते, हेच महत्त्वाचं आहे. गांधीजींच्या पावलावर पाऊल टाकून तिनं अन्नसत्याग्रह केला; थोडीथोडकी नव्हे, तर जवळजवळ 16 वर्षे...
तिची ही कहाणी आपल्याला अचंबित करते.
Added to cart successfully!